पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ५ ब्रिटिश साम्राज्य व विश्वबंधुत्व परिशिष्ट ३ ब्रिटिश साम्राज्य व विश्वबंधुत्व ( बातमी पत्र ) १८ सप्टेंबर १९१९ चळवळीच्या दृष्टीने राहता राहिले आयर्लंड. पण आयर्लंडात जाऊन हिंदु- स्थानाकरिता चळवळ करण्याची आज सोय नाहीच. वस्तुतः गरजहि नाही. होम- रूलकरिता आयर्लंडात जाऊन चळवळ करावयाची म्हणजे उघडा दरवाजा उघड- ण्याचे श्रम करण्यासारखे निरर्थक आहे. किंबहुना आयरिश लोकापुढे आपला प्रश्न काढण्याची हिंदी लोकांची छातीच नाही. याचा अनुभव आम्हास खुद्द इंग्लंडातहि येत आहे. मग तिकडे जा कशाला ? इंग्लंड स्कॉटलंड वगैरे ठिकाणी सभा होतात किंवा खाजगी चहापाय वगैरे होतात तेथे श्रोतृवर्गात आयरिश लोक भेटतात व ते आम्हाला आमची भूक होमरूलने भागेल म्हटले तर नुसते हसतात झाले ! ते म्हणतात आम्ही मूठभर आयरिश लोक सत्तर मैलावरचे म्हणजे इंग्लंडच्या टांचेखाली सापडलेले स्वातंत्र्य मागतो आणि तुम्ही सहा हजार- मैलावरचे तीस कोटि लोक नुसते होमरूल मागता ? तुम्ही माणसे आहा की जना- वरे ? पण अशा प्रश्नास उत्तर देण्याच्या भानगडीत न पडावे हेच श्रेयस्कर असे आम्हास वाटून आम्ही प्रायः गप्प बसतो. "बारा वर्षांपूर्वी तुम्ही आयरिश लोक झाला तरी स्वातंत्र्य कोठे मागत होता ? होमरूलवरच तुमचीहि तहान भागत होतीच की नाही ? विलायत सरकार गाढव म्हणून वेळेवर तुम्हाला होमरूल दिले नाही. तरी पार्लमेंटातील तुमचे ऐशी सभासद हे तुम्हाला पार्लमेंटातील पक्ष एकमेकाविरुद्ध लढविण्याचे साधन आहेच. सिव्हिल सर्व्हिस व लष्कर यातल्या वरिष्ठ जागा तुम्हाला इंग्रजाप्रमाणे मिळू शकतात. अमेरिकेसारखा तुम्हाला पाठिराखा आहे. तात्पर्य इतर बऱ्याच गोष्टीत स्वास्थ्य असल्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य आठवते. आमची गोष्ट तशी नाही. दुष्काळ पडला तर म्हणे दूधभातच का नाही खात ? असे तुम्ही आम्हास विचारता. पण त्याचा काय उपयोग १ व त्याला आम्ही उत्तर तरी काय द्यावे?" असे प्रश्न विचारून आम्हीहि वेळ मारून नेऊ शकतो. आयरिश लोकांचे या युक्तिवादाने अर्थातच समाधान होत नाही. पण सांगावयाचा मुद्दा इतकाच की, त्यांचे समाधान होवो न होवो, आमच्या होमरूलच्या मागणीला आयरिश लोक सोळा आणेच तर काय पण अठरा आगे अनुकूल आहेत ! मजूरपक्षा- इतके देखील त्यांचे मन वळविण्याचे श्रम नाहीत. आयरिश सभासद पूर्वी पाले- टात हजर रहात तेव्हा त्यानी सदैव हिंदुस्थानास मदतच केलेली आहे. व आज जर ते सिनफेनर बनले नसते तर आम्हास हल्लीच्या बिलाच्या कामी त्यांचा पुष्कळच उपयोग झाला असता.