पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ नाविषयी हे स्वसंमतीचे तत्व जाहीर करणे न्याय्य व जरूर आहे. असल्या जाहीर वचनाने हिंदुस्थानातील ३१ कोटि प्रजेची अंतःकरणे अत्यंत उल्हासाने व कृत- ज्ञतेने उचंबळून येतील हे तर खरेच. पण याहून महत्वाची गोष्ट ही की पार्लमें- टने हिंदुस्थानासंबंधी स्वसंमतीच्या तत्वाचा पुकारा केल्यास जगात शांतता नांद- ण्याची हमी देता येईल, हिंदुस्थानची भरभराट होईल, आणि आमच्या महान् हिंदिराष्ट्राशी ब्रिटिश साम्राज्याचा संबंध कल्याणकारक संबंध होऊन तो कायम राहील. परिशिष्ट २ टिळक व लेडी सिडनहॅम तिची दृष्टी टिळकांकडे गेली. त्याना असलेल्या सभेच्या एका चालकाला 'ब्रिटन अँड इंडिया' संस्थेने टिळकाना सभेला बोलावले होते. त्या प्रसंगी एक मौज झाली. टिळक सभागृहात शिरले इतक्यात पलीकडे थोड्या अंतरावर लॉर्ड सिडेनहॅम यांची बायको उभी होती. पाहताच तिला फार राग आला व जवळच ती शेजारच्या लोकाना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणाली "कोण हा तुमचा अप्रयोजकपणा ? टिळक हा राजद्रोही मनुष्य आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्यावर खटला करून त्याला सहा वर्षे काळे पाणी दाखविले. असे असता तुम्ही त्याला सभेला बोलाविता आणि त्या सभेला आम्हालाहि बोलाविता ! हा आमचा अप- मान व उपमर्द आहे." बाईचे हे शब्द संपतात न संपतात तोच लॉर्ड शॉ हे तेथे आले. ते प्रिव्ही कौन्सिलचे एक न्यायाधीश होते. ताईमहाराज प्रकरणी अपी- लाची प्रिव्ही कौन्सिलात सुनावणी झाली तेव्हा हे न्यायाधीशमंडळापैकी एक न्यायाधीश म्हणून बसले होते व अखेर त्यानी टिळकासारखा निकाल दिला होता. बॅरिस्टर बॅप्टिस्टा हे जवळच उभे होते त्यानी टिळकाना हाक मारून त्यांची व लॉर्ड शॉ यांची ओळख करून दिली. तेव्हा लॉर्ड शॉ याना फार आनंद झाला व टिळकाशी दोनदोनदा शेकहँड करून " ओ इज धिस मिस्टर टालक दि ग्रेट मॅन ऑफ इंडिया ?" असे मोठ्याने म्हणून त्यानी आपला आनंद प्रदर्शित केला. आणि मौज ही की लॉर्ड सिडेनहॅम यांची बायको जवळच उभी असून बिचारी हा सर्व प्रकार पहात होती ! प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायाधी- शानी टिळकाशी आदरबुद्धीने हस्तांलोदन केलेले पाहून बाई खजील झाली व तिने तोंड फिरविले. आणि हे दोन्ही प्रकार जवळ जवळ एकदम घडलेले पाहून बॅ. बॅप्टिस्टा याना हसे आवरेना असे सांगतात.