पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ लो. टिळकांच्या तहापरिषदेस अर्ज ९५ तरी तसे लोक आढळल्यास नवल काय ? तथापि या लोकाना देखील हिंदी लोक स्वराज्याला अपात्र वाटत नसून त्याना अधिकाऱ्यांचा कल पाहून मागणी केल्यास ती सुलभपणे साध्य होईल असे वाटते एवढेच काय ते ! हिंदुमुसलमानांची जी एकी १९१६ साली घडवून आणण्यात आली तीवरून हिंदी लोकांची यासंबंधी पात्रता चांगली सिद्ध होते. सरकारी अधिकान्यांचा विरोध दिसत असूनहि बहु- जनसमाजाने स्वसंमतीचे तत्त्व लागू करण्याची मागणी केली असून सुधारणेची सरकारी योजना निराशाजनक व समाधानकारक आहे असे मत दिले आहे. 33 यानंतर सदरहू अजीत हिंदुस्थानातील हल्लीची राज्यपद्धति कशी आहे आणि माँटेग्यु चल्म्सफर्ड योजनेने तीत कोणते फरक केले जाणार आहेत त्यांचे विस्तृत विवेचन असून काँग्रेसच्या ठरावास अनुसरून त्या योजनेतील दोषा- विष्करण केले आहे. आणि अखेरीस या अर्जांची पुढीलप्रमाणे परिसमाप्ति केली आहे. १४. " वर जी सरकारी व बिनसरकारी योजनांची तुलना केली त्यावरून हे दिसून येते की, स्वातंत्र्य हे सर्व सुधारणेचे मूळ आहे ही गोष्ट वि० सरकारच्या ध्यानात येत नाही. लोकसत्तेच्या तत्वावर स्वतःची राज्यपद्धति ठरवून आपल्या अडचणीतून आपणच मार्ग काढण्याची देशास स्वतंत्रता पाहिजे. हल्लीच्या सुधा- रणेच्या युगात कंटाळवाणी उमेदवारीची मुदत आणि दशवार्षिक कसोटी या गोष्टी असह्य आहेत. लोकाना वरिष्ठ सरकारच्या सत्तेत भागीदारी पाहिजे आहे. ती मिळाल्यास स्वसंमतांच्या तत्त्वावर देशात प्रांत किती असावे, त्यांच्या मर्यादा कोणत्या असाव्या, स्वराज्याचा पहिला हप्ता केवढा असल्यास तो पुरेसा होईल, आणि बाह्य मदत न घेता अंतर्गत कारभारात पूर्ण स्वातंत्र्य किती काळात मिळावे वगैरे प्रश्न सोडविण्यात येतील. हिंदी लोकाना साम्राज्यातून फुटून जाव- याचे नाही अशी ब्रिटिशांची खात्री करण्याकरिता आम्ही लष्कर आरमार परराष्ट्रसंबंध युद्ध व तह ही खाती आमच्याकडे मागत नाही. लष्करात व आर- मारात हिंदी लोकाना युरोपियनांच्या जोडीने कमिशने मिळाली म्हणजे बस्स आहे. मात्र पंधरा वर्षांनंतर स्वसत्ताक वसाहतीच्या जोडीने त्यांच्याप्रमाणे आम्हास सर्व बाबतीत सर्व हक्क मिळावे म्हणजे झाले. १५. अशा परिस्थितीत हिंदी राष्ट्रीय सभेने निवडलेला हिंदुस्थानचा प्रति- निधि या नात्याने माझी एवढीच मागणी आहे की ब्रिटिश वसाहतीना राष्ट्रसं- घात प्रतिनिधी पाठविण्याचा जो हक्क आहे तसाच हक हिंदुस्थानालाहि मिळावा. हिंदी लोक स्वराज्य चालविण्याला पात्र असून ते सुधारलेले राष्ट्र असल्याने त्याला स्वसंमतींचे तत्त्व लावण्यात यावे आणि या स्वसंमतीच्या तत्त्वास अनुसरून त्यानी आपल्या परिस्थितील योग्य अशा प्रकारची आणि लोकसत्ताक राज्यपद्ध- तीच्या तत्वाला धरून असलेली अशी आपली राज्यपद्धति ठरवावी. सत्याचे शाश्वत तत्व आणि दंडुकेशाद्दीवर सत्याचा झालेला विजय लक्षात घेता हिंदुस्था-