पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ खरी प्रगति होऊं शकत नाही. परकी अमलाखाली कल्पनाशक्तीस वाव मिळत नाही आणि आत्मप्रत्ययाला तर आधारच रहात नाही. अशाच शेकडो अदृश्य मार्गांनी परवशता ही राष्ट्राचे पौरुष खच्ची करिते आणि त्याच्या नैतिक व भौतिक सुधारणेचीहि कुचंबणा होते. जर्मनीच्या भीतिप्रद जुलमातून जगाची मुक्तता करून या महायुद्धाने 'नव्या युगास ' प्रारंभ केल्यानंतर आता कोणत्याहि सुधारलेल्या देशावर त्याच्या इच्छेशिवाय दुसऱ्याचा अंमल बाह्यतः त्याच्या कल्याणासाठी म्हणून देखील चालू नये हे सांगण्याची अवश्यकता राहिली नाही. या देशातील नानाविध घोटाळ्याचे प्रश्न सोडविण्याकरिता हिंदुस्थानाला 'स्वसंमती 'चें तत्त्व लाविले जावे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी हिंदुस्थानची मागणी आहे. हे प्रश्न परकी लोकाकडून सोडविले जाणार नाहीत. पाश्चात्य संस्कृतीत मुरलेले परकी सत्ताधारी कितीही बुद्धिवान व सद्बुद्धीचे असले तरी हिंदी संस्कृतीविषयी त्याना खरी सहानुभूति व कळकळ असल्याविना त्यानी हे भानगडीचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी घेऊं नये. याच दृष्टीने "हिंदुस्थानातील राष्ट्रीय सभा व मॉस्लेमलीग या दोन प्रमुख संस्थानी दिल्लीच्या बैठकीत 'हिंदुस्थान देश हा सुधारलेला देश असून त्यास 'स्वसंमती ' चै तत्व लागू करावे' असा ठराव केला. " ५. हिंदुस्थानाला स्वसंमतीचे तत्त्व लागू न करण्याला वास्तविक कोणतेच कारण नाही. त्याला अडथळा होतो तो अज्ञानी किंवा वतनदार बनलेल्या लोका- कडून होतो. हिंदुस्थानची संस्कृति ही रोम व अथेन्सच्याहि पूर्वीची आहे आणि युरोपखंडाने रानटी दशेतून डोके वर काढले नव्हते त्याच्या पूर्वीपासून कित्येक शतके हिंदुस्थान सुधारलेले राष्ट्र म्हणून गाजत आहे. शिकंदराची स्वारी हिंदु- स्थानावर होण्यापूर्वी कित्येक शतके या देशात लोकसत्ताक राज्यपद्धतींचेहि नमुने ठिकठिकाणी होते. अर्थातच हिंदी लोक लोकसत्ताक पद्धतीला नालायक आहेत असल्या राष्ट्राची बदनामी करणाच्या विधानांचा सर्व सुशिक्षित हिंदी लोकाकडून निषेध केला जातो. हिंदुस्थानचे दारिद्र्य शारीरिक न्हास औद्योगिक पुनरुज्जीवन आर्थिक उन्नति औद्योगिक शिक्षण जाति व रूढीसंबंधी नाजूक प्रश्न या सर्वोचा केवळ पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या परकीयाकडून निकाल होऊ शकणार नाही तर तो हिंदी लोकाकडूनच होईल. यासंबंधात दिल्ली येथे भरलेल्या काँग्रेसने हिंदी लोकांच्या लायकीविषयी ठराव केला असून इंग्लंडात नाटिंगहॅम येथे भरलेल्या मजूरसंघाच्या परिषदेने हिंदुस्थानदेश कानडा वगैरे वसाहतीप्रमाणे होमरूलला पात्र आहे असा ठराव केला आहे. ६. आता हिंदुस्थानाला जी नवी सुधारणेची योजना देण्यात येणार आहे तिच्याविषयी २५ कोटी लोकात एकमत होणे अशक्य आहे. बेल्जम देशावर जेव्हा जर्मनीचा अम्मल चालू होता त्या वेळी जर्मनीचा ताबा कायम रहावा असे म्हणणारे काही बेशरम इसम खुद्द बेल्जममध्ये देखील आढळले मग हिंदुस्थानात