पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील मजूरपक्ष ९१ जसे हवेत तसेच धनिकही हवेत. शेतकरी कुळांचा वर्ग जसा तिला हवा तसेच जमीनदार व इनामदारहि हवेत. आणि जसा मजूरवर्ग हवा तसाच भांडवल- वाल्यांचाहि वर्ग तिला हवा आहे. किंबहुना त्यापैकी कोणत्याहि एका वर्गाला अधिक जवळचा व दुसऱ्या वर्गाला अधिक दूरचा असे न मानता जेथे जेथे त्यातील निरनिराळ्या वर्गाचा विरोध दिसून येईल तेथे तेथे केवळ न्यायबुद्धीने दोघां- च्याहि हिताचा होईल तितका मेळ घालावा दोघांचा मिलाफ करावा आणि दोघा- कडूनहि राष्ट्रीय कार्य करवून घ्यावे असेच धोरण राष्ट्रीय सभेने राखले आहे. दोन पूर्वी विलायतेहून सकलातवाला यानी स्वराज्यपक्षाचे पुढारी पंडित मोतिलाल नेहरू याना लिहून विलायतेतील काँग्रेस पक्षाची वकिली आपल्या हाती द्यावी असा प्रयत्न केला होता. पण स्वराज्य पक्षाने त्यांचे म्हणणे न ऐकता त्याना हातभर दूरच ठेवले. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असता आठ वर्षापूर्वी टिळकानी विलायतेत ज्वल- जहाल सोशियालिस्ट लोकाशी वाजवीहून अधिक संबंध ठेवला नाही यात त्यानी वावगे केले असे कोणीहि म्हणणार नाही. विलायतेतल्या मजूरपक्षात आज देखील सकलातवाला यांचे धोरण सर्वमान्य नाही. आणि टिळक विलायतेत होते तेव्हा तर बोल्शेव्हिझमसंबंधाने नुकती चळवळ सुरू झाली होती. रशियातील मजूर- पक्षाशी पार्लमेंटरी मजूरपक्ष बंधुत्वाचे नाते जोडण्याला तयार नव्हता. आणि टिळ- काना तर पार्लमेंटरी मजूरपक्षाकडूनच आपले काम करवून घ्यावयाचे होते. म्हणून त्यानी सकलातवाल्यासारख्या लोकाशी व्यक्तिशः खासगी स्नेह ठेवला व त्यांच्या घरी आले गेले तरी काँग्रेसची मागणी हीनदीनपणाची व घातक असे ठरवून सकलातवाला यांच्या मतांचा स्वीकार त्यानी केला नाही ही गोष्ट सरळच झाली. पण या बाबतीत टिळकाना घरगुती लास सोसावा लागला नाही असे मात्र झाले नाही. होमरूल लीगचे प्रतिनिधी राष्ट्रीय सभेचे नियोजित अध्यक्ष व तिच्या शिष्टमंडळा- तील एक प्रमुख गृहस्थ या नात्याने विलायतेत टिळकांची जबाबदारी काय होती हे न ओळखिता त्यांच्याच प्रभावळीतील काही लोकानी सकलातवाला मिसेस पॅक-1 हर्स्ट यांच्या उज्ज्वल मताकडे पाहून हुरळून जाऊन टिळकाना जवळ जवळ मवाळात काढले. विलायतेत टिळकाना ज्या अनेक अडचणी सोसाव्या लागल्या त्यातलीच हीहि एक होती. आणि काँग्रेसने नेमून दिलेल्या मदतनिसानी किंवा खासगी दुय्यम प्रतीच्या सहकारी लोकानी पदोपदी अशा अडचणी आणाव्या यावरून आपल्या लोकात अद्यापि शिस्त फार कमी आहे ती आपणास अजून पुष्कळशी शिकावयाची आहे असे मनाला पटून त्याना फार खेद होई.