पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९० लो० टिळकांचे चरित्र भाग ५ थप्पडच मिळाली. पण लुडबुडे लोक थपडीला भीत नसतात. इंडो ब्रिटिश असो- सिएशन म्हणजे इकडल्या अँग्लो इंडियन लोकांचा संघ, त्याने बॅपटिस्टांच्या ठरावाला विरोध केला एवढ्यावरूनच ठरावाचे मर्म परिषदेच्या लक्षात यावयास पाहिजे होते. असो. विलायतेत होमरूल लीगच्या मार्गाीत अशा अनेक प्रकारच्या अड- चणी होत्या. "तुम्ही हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाही. हिंदी जनतेकरिता बोलण्याचा तुम्हाला अधिकार पोचत नाही" असे एकीकडून कॉन्झरवेटिव्ह पक्ष म्हणणार तर विलायतेतील जहाल मताचे बेजबाबदार हिंदी लोकहि तेच म्हणणार. पण या दोन्ही वर्गाच्या विरोधाला न जुमानता प्रथम बॅ. बॅपटिस्टा व नंतर टिळक याना आपला मार्ग या दोन डोंगरामधूनच काढावा लागला. व बेझंटवाईहि तेच धोरण नेहमी ठेवीत होत्या. राष्ट्रीय सभेत आज सामान्य जनतेचा जितका शिरकाव व्हाव- यास पाहिजे असेल तितका शिरकाव झाला नसेल. अजून वरिष्ठ व मध्यम वर्गाचे महत्त्व राष्ट्रीय सभेत असेल. तरी पण हिंदी जनतेच्यातर्फे बोलण्याचा अधिकार कॉंग्रेस व होमरूल लीग अशा संस्थानाच आहे. सोशियालिस्ट लोकांच्या दृष्टीने जिला अस्सल लोकशाही म्हणता येईल तिच्या हाती कालांतराने राष्ट्रीय सभा जाईलहि. पण या सर्व गोष्टी क्रमाक्रमानेच घडून याव्या लागतात. म्हणून टिळकानी विला- यतच्या मुक्कामात पार्लमेंटरी मजूर पक्षाशी संबंध ठेवला ही गोष्ट यथायोग्यच होती. विलायतेहून परत आल्यावर काँग्रेस डेमोक्रॅटिक नावाचा पक्ष स्थापन करून त्याच्यामार्फत कौन्सिलातील सत्ता मिळण्यासारखी असेल ती होमरूलर व काँग्रेस- वाले यांच्याच हाती ठेवण्याचा टिळकानी प्रयत्न केला. पण गांधी यांच्या प्रय- नाने व धोरणामुळे कनिष्ठ वर्ग जरी हळूहळू राजकारणात पुढे येत असला तरी गांधीनीदेखील अभिजात वर्ग धनिक लोक आणि भांडवलवाले यांचा संबंध सर्वस्वी तोडलेला नाही. स्वतः त्यानी किंवा त्यांचे धोरण संभाळणाऱ्या राष्ट्रीय सभेनेहि सोशिया लिस्ट पक्षातील ज्वलज्जहाल लोकांची तत्त्वे अंगिकारलेली नाहीत. विद्यमान काँग्रेसच्या आधारावर वरिष्ठ कायदे कौन्सिलात जे लोक शिरले व ज्यानी कॉंग्रेस पार्टी किंवा स्वराज्य पार्टी कौन्सिलात बनविली त्यानी तीन वर्षांपूर्वी टाटांच्या पोलादी कारखान्याला सरकारकडून मदत देवविली. आणि यंदा गिरणीवाल्यानाहि त्यानीच मदत दिली. काँग्रेसचे धोरण अजून केवळ मजूरपक्षालाच उचलून धरण्याचे नाही. राजकीय चळवळीत धनिक व सुशिक्षित लोकाना अजून स्थान आहे व त्यांचा अजून उपयोग आहे. आणि त्यांच्याशी सहकारितेने तो उपयोग करून घ्यावा असेच आज १९२७ साली राष्ट्रीय सभेचे धोरण आहे. पण याहून आणखी मुद्दयाची एक गोष्ट येथे सांगि- तलीच पाहिजे ती ही की, ज्या सकालतवाल्यानी होमरूल लीगला विलायतेत विरोध केला ते परवा हिंदुस्थानात येऊन गेले तरी कोणत्याहि काँग्रेस संस्थेने त्यांचे ऐकून आपल्या धोरणात बदल केलेला नाही. कॉंग्रेसला आज हिंदुस्थानातले गरीब लोक