पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील मजूर पक्ष ८९ म्हणजे जी सामान्य जनता तिचे आधी संघटन केले पाहिजे. ज्याना आधीच अधिकार मिळालेले आहेत अशा धनिक व श्रेष्ठ वर्गाचे अधिकार अधिक दृढ करणे हे काही या परिषदेचे काम नाही.' या पत्रावर सकलातवाला यांच्याशिवाय ज्या हिंदी लोकांच्या सह्या होत्या त्याची नावे खालील प्रमाणे:- मेथा अझम दत्त खान जव्हेरी मुकंदीलाल झमाल मिर्झा शंकर सरण भट भुंगारा खंबाटा व दुबाश या गृहस्थापैकी सकलातवाला यांचे नाव प्रसिद्ध असून ते दोन वेळ पार्लमेंटमध्ये निवडूनहि आलेले आहेत. इतर तेरा गृहस्थांची नावेहि बहुधा कोणाच्या ऐकण्यात नाहीत. हे लोक आपा- पल्या परीने विलायतेत हिंदुस्थानासंबंधी चळवळ करीत असतील व सोशियालिस्ट पक्षात त्यानी आपली नावे दाखल केल्याचे दिसून येते. पण त्या पक्षात त्याना फारसे महत्त्व नव्हते अशी कबुली या पत्रातच दिलेली आहे. अर्थात बॅपटिस्टा यानी होमरूल लीग आणि काँग्रेस यांच्या मताचा अनुवाद करावा की अशा तेरा किरकोळ गृहस्थांचे म्हणणे मान्य करावे ? याच अर्थाचे पत्र इंडो ब्रिटिश असो- सिएशनचे सेक्रेटरी मि. फिलिप गो यानी ट्रेड यूनियन काँग्रेसच्या सभासदाना पाठविले होते. त्यात त्यानी असे लिहिले होते की "ज्याला होमरूल पक्ष म्हणतात त्यात ब्राह्मण वकील जमीनदार अशा लोकांचाच भरणा आहे. पैकी ब्राहाण हे हिंदुस्थानात शेकडा आठ इतकेह नाहीत, असे असता कनिष्ट वर्गाला त्यानी दडपून ठेवले आहे. आणि ब्राह्मण हेच ब्रिटिश राज्यसत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात प्रमुख असतात. वरिष्ठ कार्यदकौन्सिलच्या ज्या एकोणीस सभासदानी सुधारणांची मागणी प्रथम केली त्यात निम्मे वकोल आहेत. त्यांचा धंदा लोकात तंटे वाढ- विण्याचा असतो. ते सावकार लोकाशी मिळून काम करतात व गरीब शेत- कन्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याला मदत करतात. अशा स्थितीत होमरूल देण्याने गरीब हिंदी जनतेवर जुलूम करणारा अभिजात वर्ग व दुसऱ्यांचे रक्त पिऊन जगणारे वकील यांच्या हाती मुख्य सत्ता दिल्यासारखे होईल. म्हणून मजूरपक्षाने होमरूलचा पुरस्कार करणे हे त्याच्या उच्च ध्येयाला विसंवादी होईल, होमरूलच्या हल्लीच्या योजनेने मुसलमानासारखे अल्पसंख्याक व अस्पृश्यासारखे पिढ्यान पिढ्या गांजलेले लोक यांच्या माथी दास्य कायमचे मारले जाईल. पुष्कळ भागात मुसलमानावर हिंदूनी हल्ले करून त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट केल्या आहेत! अशा स्थितीत खरी लोकशाही कशी अवतरेल ? खरे स्वराज्य प्रस्थापित व्हावयाचे तर ते हिंदु- स्थानातील अधिकारीच करू जाणत व करू शकतील. कारण त्यांच्याच अमला- खाली सामाजिक स्थिति हळुहळू बदलत चालली आहे. म्हणून मजूरपक्षाच्या या परिषदेने अॅपटिस्टा यानी सुचविलेला ठराव मान्य करू नये ! " या पत्रावरून परस्पर विरुद्ध अशा दोन दिशानी होमरूल लीगच्या विरुद्ध प्रयत्न कसे चालले होते हे दिसून येईल. अखेर बॅपटिस्टा यांच्या ठरावापैकी पहिलाच भाग तेवढा परिषदेने मंजूर केला, इंडो ब्रिटिश असोसिएशनच्या लुडबुड्या सेक्रेटरीला ही