पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० ला० टिळकांचे चरित्र भाग १ होमरूल आणि साम्राज्यांतर्गत स्वराज्य यांत वस्तुतः फारसा भेद नाही. पण होमरूल हा शब्द सुटसुटीत असून तो उच्चारल्याबरोबर आयर्लंडचा इतिहास माहीत असणाराना तिकडे झालेल्या एका मोठ्या चळवळीची आठवण होते व त्याच्या कायदेशीरपणासंबंधाने शंका उरत नाही म्हणून 'होमरूल' या नावाने स्वराज्याची चळवळ करावी अशी कल्पना होती. पण बेझन्टबाईनी त्यांच्या प्रवृत्तिपर स्वभावाप्रमाणे आणि एकतंत्रीपणामुळे मनात येताच ती गोष्ट करूनहि टाकली ! वता. २५ सप्टेंबर १९१५ च्या न्यू इंडिया पत्रात बाईनी आपल्या स्वराज्यसंघाची उद्देशपत्रिका प्रसिद्ध केली. त्यात असे लिहिले होते की "आमचा हा लीग राष्ट्रीय सभा काँ. कमिटी या संस्थाना पुरवणीदाखल असून लीगचा हेतू काँग्रेसच्या प्रतिज्ञापत्त्रकाला धरून लोकाना राजकीय शिक्षण देणे हा आहे. याच्या शाखा हिंदुस्थानात व इंग्लन्डात देखील काढल्या जातील. १९०६ साली दादा- भाई नौरोजी यानी हिंदुस्थानाकरिता स्वराज्याची मागणी केली व त्यानीच या लीगचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल केले आहे आहे. शिवाय हिंदुस्थानातील शाखेचे अध्यक्ष सर सुब्रह्मण्यम् अय्यर व विलायतेतील शाखेचे अध्यक्ष सर बुइलियम वेडरबर्न असे अध्यक्षहि आम्हास लाभले आहेत. या लीगने काँग्रेसला कोणत्याहि तन्हेने बाध येणार नाही. असा लीग स्थापण्याची गरज युद्ध संपून गेल्यापेक्षा ते चालू आहे तोंवरच अधिक आहे. " अशा रीतीने बाईनी होमरूल लीग काढून अघाडी मारली इतकेच नव्हे तर काँग्रेसचे दोन जुने अध्यक्ष काबीज केले. यामुळे लीग आणि काँग्रेस यांचा विरोध नाही ही गोष्ट सहजच सिद्ध झाली. पण उद्देशपत्रिकेतील भाषेवरून बाई- नीहि हिंदुस्थानातील काँग्रेसच्या आणि विलायतेतील त्रि. कमिटीच्या कार्यपद्धती- वर शिंतोडा कसा न कळत उडविला होता हे दिसून येईलच. आणि असा शिंतोडा न उडवून भागेल तरी किती दिवस ? नेमस्तानी राष्ट्रीय सभेचे नाव ताब्यात ठेवून इतर बऱ्याच पक्षाना बाहेर ठेवले पण स्वतः मात्र लोकशिक्षणाचे काम सहा वर्षात काहीच केले नाही. टिळकांप्रमाणे बाईहि स्पष्ट बोलत आणि नेमस्त पक्ष काही काम करीत नाही ही गोष्ट त्यानाहि मान्य होती. टिळकानी केसरीतून बाईच्या या नव्या संघाच्या कल्पनेला पाठिंबा दिला. सरकार जसे अमुक इतक्या शतकात स्वराज्य देऊं असे निश्चित सांगत नाही त्याचप्रमाणे आम्ही अमुक इतक्या काळाच्या आधी स्वराज्य मागणार नाही असाहि कोठें करार केलेला नाही. अर्थात् ते किती लवकर मागावे एवढाच नेमस्त व जहाल यांच्यात फरक राहणार. पण एवढ्याकरिता स्वराज्य काही वेळ आधी मागणाऱ्या राष्ट्रीयाना जहाल हे मुत्सद्देगिरीस पारखे झालेले किंवा देशाचे अनहित करण्याला उठलेले असे म्हणणे बरोबर होणार नाही. दादाभाईनी मद्रा- सच्या होमरूल लीगचे अध्यक्षस्थान स्वीकारले ही बातमी वाचताच मद्रासच्या व मुंबईच्या नेमस्ताना विषाद वाटला व ते त्याना निवृत्त करण्याच्या खटपटीला