पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ जनतेचे नाव घेऊन जे काम करता व जे धोरण ठेविले आहे ते त्याना पसंत नाही. येथील हिंदी तरुणाना तुम्ही आपल्या विश्वासात घेत नाही. हल्ल येथील ट्रेड युनियन कॉन्फरन्सपुढे जे ठराव ठेवले ते असे तसेच होते. तुमच्या ठरावा- बरून हे उघड दिसून आले की आजचे व्यावहारिक राजकारण तुम्हाला कळत नाही व तुमचे धोरण साफ चुकीचे आहे. यापुढे तरी तुम्ही हा एकलकोंडेपणा सोडा. केवळ आपल्यापुरते पाहून समाधान न मानता स्वयंनिर्णयाचे खरे तत्त्व काय ते ओळखा. खरी लोकशाही हिंदुस्थानात प्रस्थापित करावयाची तर सगळी राजकारणाची मांडणी वेगळ्या पायावर करायला पाहिजे हे लक्षात आणा. आणि तुमच्या संकुचित धोरणामुळे या देशात हिंदुस्थानचे तुम्ही नुकसान करीत आहात हेहि नीट ध्यानात घ्या. 33 पण सकलातवाला यांचा बॅपटिस्टा यांच्यावर असा राग का झाला है आता थोडक्यात पाहू. बॅपटिस्टा यानी हल येथील मजूर परिषदेकडून जो ठराव पुढे आणविला त्याच्या पहिल्या भागात "हिंदुस्थानाला स्वयंनिर्णयाचा अधिकार ताबडतोब व सर्वकाळ मिळावा अशाविषयी मजूरपक्ष होईल तितका नेट धरून विलायत सरकारशी भांडेल व सामान्यतः होमरूलपक्षाचे धोरण या परिषदेला मान्य आहे" असा मजकूर होता. पण पुढे तपशिलात शिरून काँग्रेसची स्वराज्य- विषयक मागणी कलमवारीने लिहिली होती. म्हणजे १ हिंदुस्थानची भाषावार प्रांत- रचना करावी. २ अखिल भारतीय प्रश्न म्हणजे लष्कर आरमार परराष्ट्रीय संबंध वगैरे गोष्टी ब्रिटिश पार्लमेंटकडे राहाव्या पण पार्लमेंटने वसाहतीप्रमाणे त्या कार- भारात हिंदुस्थानचे म्हणणे ऐकून घ्यावे. ३ जबाबदारीचे तत्व वरिष्ट व प्रांतिक कार- भारात प्रविष्ट व्हावे " इत्यादि इत्यादि. या ठरावाला सकलातवाला व इतर तेरा हिंदी गृहस्थ यानी विरोधदर्शक एक पत्र परिषदकडे पाठविले. त्यांचे म्हणणे असे की " याप्रमाणे हिंदुस्थानची राज्यघटना झाल्यास सुशिक्षित अभिजात व श्रीमान् अशा वर्गाकडेच राजकीय सत्ता राहील. या घटनेत हिंदुस्थानातील लोक वरिष्ठ वर्गाच्या दास्यात कायमचे राहतील अशीच योजना आहे. पण इंग्लंड व युरोप खंड यातील सोशियालिस्ट लोकानी जी तत्वे आज मान्य केली आहेत आणि ज्या तत्त्वाना अनुसरून हल येथील परिषदेचे इतर ठराव होणार आहेत त्याशी होम- रूल लीगचे हे धोरण विसंगत आहे. हे पत्र पाठविणाऱ्या आम्हा लोकांचे या परिषदेत कोणी ऐकणार नाही हे आम्ही जाणून आहोत. आणि हिंदुस्थानातहि नोकरशाहीच्या सत्तेखाली आम्हा लोकांची तीच स्थिति आहे. तरी परिषदेला आमची विनंती अशी की तिने या ठरावापैकी पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा तेवढा सर्वसामान्य ठराव मांडून पास करून घ्यावा. कारण तपशी- 'लाच्या गोष्टी वादग्रस्त आहेत. तसे न झाले तर ब्रिटिश साम्राज्याला ज्या धनिक व भांडवलवाल्या लोकांचा मुख्य आधार आहे त्याच्या सत्तेला आपल्या या परि- षदेने मान्यता दिली असे मनात नसताना घडेल. खऱ्या लोकशाहीचे धनी