पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील मजूरपक्ष 617 सभानाहि ते जात व ही गोष्ट कॉटन वगैरे लोकाना आवडत नव्हती. आणि त्यामुळे इकडच्या काही नेमस्तानाहि ती आवडत नव्हती अशी आमची समजूत आहे. पण दादाभाई हे जवळजवळ सर्वभेदातीत असण्याइतके इतके सात्विक होते. यामुळे ते आपल्या कामापुरता कोणाशीहि संबंध ठेवीत. मजूर पक्ष प्रबळ होण्याच्या काळी ते विलायतेहून इकडे परत आले होते. त्यांच्या नेमस्त अनु- यायानी नंतर मजूर पक्षाशी संबंध ठेवलेला आढळत नाही. युद्धानंतरच मजूर पक्ष अधिक सरसावला. त्या सुमारास होमरूल लीगची चळवळ निघून टिळ- कानी बॅ. चॅपटिस्टा याना विलायतेस पाठविले. तेव्हा प्रत्यक्ष परिस्थिति पाहून बॅपटिस्टा याना असे दिसून आले की काँझरव्हेटिव्ह पक्ष हा हिंदुस्थानाला वाढते राज्याधिकार देण्याचा विरुद्धच नेहमी राहणार. लिवरल व रॅडिकल पक्ष जवळ- जवळ अस्तंगत झाला. यापुढे मजूर पक्षच खरा उदयोन्मुख आहे. म्हणून होमरूल लीगने त्यांच्याशीच ऋणानुबंध जोडावा. विलायतेहून नॅपटिस्टा यानी इकडे पन्नास पाऊणशे पत्रे पाठविली त्या बहुतेकात हीच कल्पना परोपरीने आळवून सांगितली आहे. टिळकानाहि दुरून तेच दिसत होते. आणि विरोधी पक्षातूनच पार्लमेंटमध्ये हिंदी राजकारणाचा समावेश झाला तर होऊ शकेल ही अटकळ त्यानी येथूनच बांधली होती. पुढे विलायतेस गेल्यावर तर सर्व प्रकार त्याना स्पष्टच दिसून आला. आणि त्यानी त्या पक्षाच्या आश्रयानेच आपली चळवळ केली. पण त्यातहि त्यानी नेहमीप्रमाणेच विवेक ठेवला होता. मजूर पक्षातील उपपक्षांची त्याना माहिती झाल्यावर होता होईल तो व त्यातल्यात्यात पार्लमेंटरी मजूर पक्षाशीच निकट संबंध ठेवणे हे अधिक श्रेयस्कर असे त्याना दिसून आले. केवळ एका कलाटणीत सर्व स्वराज्य मिळेल ही कल्पना त्यांच्या मनाला केव्हाहि शिवली नाही. आणि केव्हाह मागच्या पुढे एकच पाऊल टाकावयाचे हे त्यांचे नेहमोचे धोरण असल्यामुळे- म्हणजे प्रथम स्वराज्यविषयक एखादे बिल विरोधी पक्षाकडून पार्लमेंटमध्ये घुसविणे हीच ती पहिली पुढची पायरी असे त्याना वाटत असल्यामुळे त्यात- ल्यात्यात जवाबदार व सामोपचारवादी असा जो उपपक्ष त्याच्याशी त्यानी आपले संबंध जोडले. या बाबतीत त्यांचे व बॅ. बॅपटिस्टा यांचे एकमत होते. बेझंटवाईहि मजूर पक्षाशी संबंध ठेवणान्या असल्या तरी त्यातल्यात्यात पार्लमेंटरी मजूर पक्षाशीच संबंध ठेवीत. ही गोष्ट सकलातवाला यांच्यासारख्या जहाल मजूर पक्षीयांच्या लक्षात आली व त्याना त्याचा थोडासा हेवाहि वाटू लागला असे त्या वेळच्या पत्रव्यवहारावरून दिसून येते. उदाहरणार्थ खालील पत्र पहा:- सकलातवाला यांचे बॅपटिस्टा याना पत्र लंडन २३ जान्युआरी १९१८ " तुम्ही होमरूलर लोकानी स्वराज्याची जी घटना म्हणून तयार केली आहे ती इंग्लंडांतील हिंदी लोकाना आवडत नाही. तुम्ही येथे एकंदर हिंदी