पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ लौ० टिळकांचे चरित्र भाग ५ टिळकानी लिबरल व रॅडिकल पक्ष मागे टाकून विलायतेतील मजूर पक्षाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला हे मोघम विधान होय. पण हा मजूरपक्ष कोणता हे स्पष्ट करून सांगितले पाहिजे. कारण मजूरपक्षात देखील अनेक उपपक्ष आहेत. त्यात स्वतंत्र मजूरपक्ष अधिकारी मजूरपक्ष पार्लमेंटरी मजूरपक्ष क्रांति- कारक मजूरपक्ष व कम्युनिस्ट मजूरपक्ष असे भेद आहेत. पूर्वी सुरतेच्या राष्ट्रीय सभेनंतर घडलेल्या हकीगतीचे वर्णन देताना आम्ही असे म्हटले आहे की दोन परस्पर विरुद्ध टोके सांधणारी अशी अनेक दुव्यांची साखळी कोणत्याहि समा- जात एकत्र गाठलेली असते. मजूरपक्षाचीहि हीच स्थिति पूर्वी होती व आजहि आहे. त्यात त्या पक्षाच्या मानाने नरम गरम जहाल मवाळ असे भेद आहेतच. इतकेच नव्हे तर इकडील मवाळ जहालाप्रमाणे त्यांच्यातहि परस्पर स्पर्धा अस तेच. आणि जो नवा मनुष्य या पक्षाशी म्हणून संबंध जोडावयाला जातो त्याला ही अडचण नेमकी येऊन पडते की या पक्षातील कोणाशी संबंध किती ठेऊ ? हल्ली एका टोकाला श्रीमान् अमीर उमराव हे या पक्षात सामील झाले आहेत तर रक्तवर्ण रक्तातले किडे असे कम्युनिस्ट किंवा बोल्शेविक हे या पक्षाच्या दुसन्या टोकाला आहेत. दरम्यान सिडने चैव बर्नाड शॉ यांच्यासारखे बौद्धिक सोशियालिस्ट, वेजवूड स्पूर यांच्यासारखे पार्लमेंटरी सोशियालिस्ट, रॅम्से मॅक्डोनाल्ड फिलिप स्नोडन यांच्यासारखे स्वतंत्र विचारांचे आणि संप वगैरे उठावाचे उपाय योजण्याच्या विरुद्ध असणारे सोशियालिस्ट, लॅन्सबरीसारखे अशा उपायाना न भिणारे सोशियालिस्ट, स्माइली रॉबर्टस् यांच्यासारखे प्रत्यक्ष मजूरवर्गात वाढलेले आणि संप वगैरे निर्वाणीच्या उपायावर ज्यांची बहुतेक भिस्त असे सोशियालिस्ट, आणि त्याच्या पलीकडे मिसेस पॅकहर्स्ट सकलातवाला यांच्यासारखे रशियाशी संबंध ठेवून त्याचे अनुकरण इंग्लंडात करू इच्छिणारे सांशियालिस्ट असे किती तरी आहेत. केवळ हिंदी मनुष्य म्हटला म्हणजे तेवढ्यावरून परदेशी मनुष्याला जसा त्याच्या विशिष्ट जातीचा बोध होत नाही त्याचप्रमाणे मजूरपक्षाचा मनुष्य किंवा सोशिया- लिस्ट म्हटला म्हणजे तेवढ्यावरून त्याच्या जातीचे किंवा गणगोत्राचे सर्विकल्पक ज्ञान आह्मालाहि होत नाही. नुसते नाना म्हटले म्हणजे पूर्वी इंग्रजाना फडणीस नाना किंवा बंडखोर नाना हा भेद कळत नसे त्याचप्रमाणे सोशियालिस्ट म्हट- ल्याने आम्हालाहि सूक्ष्म भेद कळत नाही. इकडे जेव्हा एखादा सोशियालिस्ट येते। तेव्हाही तो मी अमुक उपपक्षाचा असे म्हणून येत नाही आणि आम्हीहि इतक्या खोलात जाऊन चौकशी करू इच्छित नाही. आम्हाला काय ? सहानुभूति दाख विणारा एक इंग्रज अधिक झाला तितकेच सई. पण विलायतेत गेल्यावर अशा स्थूल विवेकाने चालत नाही. सूक्ष्मच विवेक करावा लागतो. तसा प्रसंग येण्याला दादाभाईपासूनच सुरुवात झाली होती. दादाभाई ३०/४० वर्षे विलायतेस राहिले. हाइडमनसारख्या लोकाशी त्यांचा संबंध आला. तथापि ते स्वतः पार्लमेंटमध्ये लिबरल म्हणूनच शिरले होते. मजूर पक्षांच्या