पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील मजूर पक्ष ८५ होती. त्यावेळच्या बिलाची कलमे व या बिलाची कलमे ही अर्थात् वेगळी अस- णार. पण प्रयत्नाची दिशा एकच. या विषयावर विलियम डिबी व टिळक यांचा मधून मधून पत्रव्यवहार सुरू असे. आणि युद्धानंतर शिष्टमंडळे • पाठविण्याची बोलवा सुरू झाली तेव्हा वॅ. बॅपटिस्टा याना विलायतेस पाठवून टिळकानीच तिकडील चळवळीला खरा प्रारंभ केला. (६) विलायतेतील मजूरपक्ष विलायतेत टिळकानी अमुक एका दिशेने प्रयत्न करण्याची वाकी ठेवली नव्हती. अधिकाऱ्यांना भेटण्याच्या रीतीने ते अधिकान्याना भेटत, वर्तमानपत्राना मधून मधून कोणाकडून तरी लिहवीत. मजूरपक्षाशी त्यानी परिचय करून घेऊन डेली हेरल्ड पत्र आपलेसे केले होते. लॅन्सवरी व वेजवूड हे त्यांचे चहाते बनले होते. ब्रिटिश काँग्रेस कमिटीच्या ऑफिसचा व इंडिया पत्राचा उपयोग होईल तितका करण्याची खटपट त्यांची चालूच होती. पण पोलॉक साहेबानी त्याना बरेच दिवस दाद दिली नाही. काँग्रेसवर इंडिया पत्राने टीका करणे आणि पर्यायाने माँटेग्यूसाहेबांची मते हीच बरोबर असे प्रतिपादन करणे ही गोष्ट टिळकाना खप- णारी नव्हती. व त्यावरून त्यांचा व पोलॉक साहेबांचा पत्रोपत्री खडाजंगी वाद झाला. इंडिया पत्राने आपली बाजू उचलून धरावी असे माँटेग्यूसाहेबाना वाटणे स्वाभाविक होते. कारण ते आपल्याकडून होईल तितके हिंदुस्थानचे हितच करीत होते. आणि पोलॉकसाहेबानी इंडिया ऑफिसच्या लोकाशी खासगी संबंध ठेवावा यात काही गैर नव्हते. पण हे सर्व स्वाभाविक असले तरी विलायतेत कॉंग्रेसची मते कोणी मांडावी याचे उत्तर पोलॉकसाहेबाना किंवा ब्रिटिश कमिटीला देता आले नाही. असो. शिष्टमंडळ विलायतेस जाईपर्यंत इंडिया पत्र हाती लागणे शक्य नाही असे ठरवून टिळकानी सेंट निहालसिंग यांचा उपयोग करून घेण्याची खटपट केली व त्याना लीगचे काम पगारी करता का असे विचारले, वर्तमान- पत्रातील लेखक या नात्याने त्यांचा जम बरा बसला होता. ते लेखकहि चांगले होते. म्हणून होमरूल लीगचे काम करण्यास ते मिळविण्याचा प्रयत्न झाला. निहालसिंग यानी होय म्हटल्यावरून टिळकानी ता. २३ नोव्हेंबर रोजी त्याना लेखी अटी पाठ- विल्या. पण 'मी सर्व वेळ तुमचे काम करणार नाही. स्वतंत्रपणे करता येईल. तेवढेच करीन' असे त्यानी कळवल्यावरून टिळकानी त्यांचा नाद टाकला... होमरूल लीगशी उघडपणे संबंध ठेवण्याला निहालसिंग हे तयार नव्हते असे दिसते. पैशाचेहि पटले नाही असे वाटते. निहालसिंग यांच्या स्वाधीन पंधराशे पौंड करावे आणि त्यात त्यानी शिष्टमंडळाच्या मुक्कामात प्रसिद्धी खात्याची सर्व व्यवस्था ठेवावी असे सुचविण्यात आले होते. पण अखेर काही जमले नाही असे दिसते. नंतर एडगर वॉलेस नावाच्या एका इंग्रज लेखकालाहि टिळकानी काही दिवस मतप्रसाराचे काम दिले होते.