पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ लो. टिळकांचे चरित्र भाग ५ तरी खरे कोणते, हे की ते असा संशय लोकाना सहजच येतो. म्हणून एका वेळी मुख्य बोलणारा एकच व त्याला फक्त मदतनीस म्हणून दुसरा अशी जोडी पाठ- वावी. कोर्टात जसे एकाच पक्षकाराने वकीलपत्र दिलेले अनेक वकील असतात पण त्यातील श्रेष्ठ व प्रमुख तोच जबाबदारीने बोलत असतो व बाकीचे फक्त त्याला सुचवीत असतात त्याचप्रमाणे विलायतेतील हिंदुस्थानच्या वकिलातीचे हि व्हावे. अमेरिकेतहि जमल्यास अशीच वकिलात स्थापावी. क्रि० कमिटी व इंडिया पत्र याकरिता हल्लीप्रमाणे सालीना ३०/४० हजार रुपये द्यावे. शिवाय आणखी ५०/६० हजार म्हणजे एकंदर सुमारे एक लक्ष रुपये सालीना खर्चण्याचा काँग्रे- सने निश्चय करावा. 23 ही योजना सुचविण्यात टिळक सहीने नसले तरी कृतीने सामील होते. या योजनेचा पुढे काही उपयोग झाला नाही ही गोष्ट वेगळी. अमृतसरच्या राष्ट्रीय सभेपर्यंत ठीक चालले होते. त्या सभेनंतरहि इंडिया पत्र सुरू होते. इकडील हकी- गती त्यात येत होत्या. काँग्रेसची मते प्रसृत करण्याचे काम त्याच्या द्वारे सुरू होते. पण पुढे इकडे असहकारितेचे वारे खेळू लागले. ज्या गांधीनी स्वतः पूर्वी विलायतेतील चळवळीला इतके महत्त्व दिले आणि विलायतेत राहून जातीने ती केली त्यानांच त्या चळवळीला बहिष्कार घातला. यामुळे ती चळवळ बंद पडली. काँग्रेसने पैसे पाठविण्याचे बंद केल्यावर इंग्रज लोक काय आपल्या खर्चाने कमिटी व पत्र चालविणार ? त्यानी मनात आणले असते तरी ते झेपले नसते. उलट काँग्रेसजवळ या कामाला पुढे केव्हा पैसा नव्हता असेहि नाही. टिळक-स्वराज्य-फंडाची रक्कम एक कोटीपर्यंत जमली. त्यातील काही पैसा पर- देशी चळवळी करिता बाजूला ठेविला असता तर शिष्टमंडळाने १९१९ साली सुच- विलेल्या योजनेप्रमाणे ही चळवळ अजून चालली असती. पण ते घडून आले नाही. उलट १९२० साली विठ्ठलभाई पटेल हे दुसऱ्याने आपले पूर्वीचे काम पुरे करण्याकरिता म्हणून विलायतेला गेले त्यावेळी टिळकानी त्याना पैशाची बरीच मदत केली ही गोष्ट प्रसिद्ध नसली तरी खरी आहे. विलायतेतील चळवळीचा टिळकांपुरता हा इतिहास असा आहे. टिळकांच्या हाती पूर्वीपासून पैसा असता तर त्यानी हिंदुस्थानातल्या प्रमाणे परदेशच्या चळवळी- कडेहि तो खर्च केला असता. त्यानी अमेरिकेत काम करणाऱ्या मंडळीना शक्य तेवढी पैशाची मदत वेळोवेळी केली. आणि एक रकमेने उचलून तीस हजार रुपये विलायतेतील मजूरपक्षाला दिले. यावरूनच हिंदुस्थानातील चळवळीला जोड म्हणून परदेशची चळवळहि टिळकाना अभिप्रेत होती हे स्पष्ट दिसून येईल. लाहोर काँग्रेसच्या आधी म्हणजे १८८९ साली ब्रँडला हे हिंदुस्थानात आले व राष्ट्रीय सभेला हजर राहिले तेव्हाच त्यांच्याशी टिळकानी या बाबतीत वाटाघाट केली होती. व पार्लमेंटमध्ये स्वराज्यविषयक बिल आणण्याचे जे काम हल्ली बेझंट- बाईंनी चालविले आहे त्याची पूर्वसूचना १८८९-९० सालाच्या सुमारासच झाली