पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ विलायतेतील चळवळीचे समालोचन ८३ वगैरे लोक राष्ट्रीय सभेच्याहि पुढे जाऊन मागणी करावी असे म्हणणारे होते. पण टिळकानी या दोघांचाहि मार्ग न स्वीकारिता फक्त काँग्रेसचीच मागणी पुढे मांडावयाची असा निश्चय ठेविला होता. नक्की किमान म्हणून मागितले तरी ते सरकार देत नाही या दृष्टीने ते मागणे जहालच. उलट चमनलाल व हॉर्निमन हे निव्वळ ध्येयवादित्वाच्या दृष्टीने टिळकांच्या पुढे जाऊ शकतील हे संभवत नव्हते. पण मर्यादेची म्हणून रेघ कोठे तरी ओढावीच लागते. आणि त्यातल्या त्यात ती राष्ट्रीय सभेच्या मागणीला धरून ओढली तर हे हिंदुस्थानातील लोक- मत व ही राष्ट्रीय सभेची स्पष्ट आज्ञा असे सांगून तिचे समर्थन तरी करता येईल. एवढ्याचकरिता टिळकानी ती मर्यादा म्हणून ठरविली होती. आणि ही मर्यादा सांभाळून विलायतेस तेव्हाच काय पण त्यापुढेहि जितकी चळवळ होईल तेवढी हवीच असे त्यांचे म्हणणे असे. विलायतेहून टिळक परत येईपर्यंत त्रि. कॉ. कमिटी मोडली नाही. किंवा इंडिया पत्र बंद पडले नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेस- शिष्टमंडळाच्या ज्या रिपोर्टाचा वर उल्लेख आम्ही केला आहे त्यातच विलायतेत पुढे चळवळ कशी चालू ठेवावी याविषयी विधायक सूचना केल्या आहेत. अमेरिकेत लजपतराय यानी केवळ हिंदुस्थानाला वाहिलेले मासिकपत्र सुरू केले होमरूल लीगच्या शाखा काढल्या आणि अनेक ठिकाणी व्याख्याने देण्याची तजवीज केली याबद्दल रिपोर्टात लालाजींची स्तुती केली आहे. व त्यांचे उदाहरण देऊन विलायतेत देखील तशीच चळवळ झाली पाहिजे असे म्हटले आहे. "या पुढील निदान पाच वर्षे साम्राज्याच्या घटनेच्या इतिहासात फार महत्त्वाची ठरतील. राष्ट्रसंघ स्थापित झाला असून त्याच्या- पुढे हिंदुस्थानाला स्वयंनिर्णयाचा आपला हक्क प्रस्थापित करावा लागेल. खुद्द इंग्लंडातहि बन्याच प्रकारची घडामोड होणार आहे. यामुळे विलायतेतील लोक साम्राज्यातील जितराष्ट्रांच्या तक्रारीकडे अधिक लक्ष देतील म्हणून स्वराज्याची चळवळ विलायतेपर्यंत नेऊन भिडविण्याला हीच उत्कृष्ट संधि आहे. अशी संधि पुनः येणार नाही. याकरिता हिंदुस्थानाबाहेर इंग्लंड अमेरिका युरोप या ठिकाणी सतत चळवळ चालू ठेवावी" अशी टिळकप्रभृति शिष्टमंडळाने शिफारस केली आहे. फक्त जुना इतिहास लक्षात घेऊन व पुढील कामाचा अंदाज बांधून त्यानी असे सुचविले की एक जुना अनुभवी व एक नवा तरतरीत असे दोन प्रमुख हिंदी गृहस्थ राष्ट्रीय सभेने वेळोवेळी नेमून ते त्रि. काँ. कमिटीच्या जोडीने काम करण्याला पाठवावे. "मात्र त्या दोघाना राष्ट्रीय सभेच्या मताप्रमाणेच काम कर- ण्याचा स्पष्ट हुकूम द्यावा. काँग्रेसने यावेळी शिष्टमंडळ पाठविले त्याचा अनुभव चांगलासा आला नाही. कारण त्यात आधी पुष्कळ लोक पाठविले आणि हि निरनिराळ्या स्वभावाचे व वृत्तीचे. असे दहा लोक दहा ठिकाणी व्याख्याने देण्याला गेले म्हणजे त्यांच्यात सहजच फरक पडतो. व राष्ट्रीय सभेचे म्हणणे टि० उ... ३०