पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ प्रसार करणार हे माहित असल्याने ब्रिटिश कमिटीचे चेअरमन म्हणून डॉ. क्लार्क यानी पुढे पुढे शिष्टमंडळाला सर्व प्रकारे मदत केली. ब्रिटिश कमिटीचे ऑफिस लायबरी ही काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या पूर्णपणे स्वाधीन करण्यात आली. इंडिया पत्नाच्या मदत - संपादकीण बाई मिस् नॉर्मेटन यानी शिष्टमंड- ळाला कचेरीच्या कामाची मदत करावी असे ठरले. राहता एकच गणंग राहिला तो पोलॉकसाहेब ! त्या गणंगाची दाताखाली पूड होईना व मऊ जीभेने तो बाहेरहि निघेना. तेव्हा गणंग जसा शेवटी तोंडात करंगळी घालून बाहेर काढावा लागतो त्याप्रमाणे इंडिया पत्राला नवा संपादक नेमून पोलॉक साहेबांचा राजि- नामा घ्यावा लागला ! काँग्रेसचा पगार घेत असता काँग्रेसच्या धोरणाविरुद्ध मजकूर इंडिया पत्रात लिहावयाचा असा आग्रह पोलॉक सारख्या स्वाभिमानी गृहस्थाने कसा धरला यांचे कोणालाहि आश्चर्य वाटण्यासारखेच होते. ब्रिटिश कमिटीशी असा तंटा करण्यात कोणालाच मोठे सुख वाटत नव्हते. पण हा विरोध इतका दुस्तर झाला की शेवटी पोलाकसाहेबाना काढून टाकण्याचा वाईटपणा घेण्याशिवाय शिष्टमंडळाला गत्यंतर उरले नाही. कित्येकाना असा भ्रम आहे की टिळकानी विलायतेस जाऊन इंडिया पत्र बंद पाडले व ब्रि. काँग्रेस- कमेटी मोडून टाकली ! पण ही गोष्ट खोटी आहे. टिळकाना विलायतेत चळवळ चालावयाला हवी होती पण ती नव्या पक्षाच्या धोरणाने विलायतेत चळवळ करण्याचे वावडे टिळकाना वाटत असते तर ते विलायतेस जातेच ना. हिंदु- स्थानाला हवा तसा त्वराज्याचा कायदा प्रारंभी तरी ब्रि. पार्लमेंटकडून घेणेच प्राप्त ही गोष्ट टिळकाना मान्य होती. आणि काही लोक उल्कापातातील ताऱ्या- प्रमाणे चमकून जाता जाता टिळकाना मवाळ म्हणून नावे ठेवीत तेव्हा ते हीच गोष्ट त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून आणीत ! तसेच एकच गोष्ट पण ती विलायतेत व हिंदुस्थानात अशी दोन ठिकाणी थोड्या फरकाने व निराळ्या पद्धतीने मांडली पाहिजे ही गोष्टहि टिळकाना मान्य होती. किंबहुना ही गोष्ट त्यानी स्वतःच अमलात आणिली. म्हणून हिंदुस्थानातील त्यांची ऐकीव कीर्ति एक व येथील अनुभव निराळा म्हणून विलायतचे लोक केवळ या तुलनेने त्याना नेमस्त म्हणू लागले. पण नेमस्त हा शब्द तोच असला तरी गोखल्यांचे व टिळकांचे वर्णन त्यानी या एकाच शब्दाने कधीच केले नसते. उलट टिळक देखील हॉर्निमन चमनलाल यांच्या तुलनेने नेमस्त म्हणवून घेण्यास तयार झाले होते तरी त्यानी आपला मुद्दा कधीहि सोडला नव्हता. तो मुद्दा हा की 'मुंबई स्पेशल काँग्रेसने ज्या सुधारणांची मागणी केली किंवा शिष्टमंडळ पाठविताना त्याना ज्या मागणीचा आग्रह धर- ण्याची काँग्रेसने आज्ञा केली त्या मागणीला चिकटून राहणे' हे कर्तव्य होय. एका बाजूला ही मागणी दिली करावी असे लिबरल पक्षाचे म्हणणे होते. बेझंटवाईहि तीच सवलत मिळेल तर काँग्रेसच्या शिष्टमंडळात येऊ असे म्हणत होत्या. जिनाहि तेच म्हणत होते. आणि दुसऱ्या बाजूस हॉर्निमन व चमनलाल