पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील चळवळीचे समालोचन ८१ वाटू लागले. इकडे राष्ट्रीय सभेतच टिळकादिकांचे काही अखेरपर्यंत चालले नसते तर प्रश्नच नव्हता. पण १९१८ च्या सुमाराला नेमस्त लोक हळूहळू राष्ट्रीय सभेतून निघून गेले. राष्ट्रीय सभेच्या ठरावात चढता सूर लागू लागला. युद्धामुळे स्वराज्य व स्वयंनिर्णय यांची भाषा ग्राम्यतेतून संभावितपणात व नाग- रिकतेत आली. आणि प्रतिकाराचे पाऊल प्रत्यक्ष पुढे पडूं लागल्याचे दिसू लागले. तेव्हा कॉंग्रेसच्या मताना विलायतेतहि पाठिंबा मिळावा अशी आकांक्षा उत्पन्न झाली. व ब्रिटिश कॉंग्रेस कमिटी व इंडिया पत्र ही जर राष्ट्रीय सभेची अंगे म्हणवितात व तिच्या पैशाने चालतात तर त्यानी राष्ट्रीय सभेची मतेच प्रति- पादिली पाहिजेत हे म्हणणे हक्काचे व न्यायाचे सहजच वाटू लागले. पण ब्रिटिश काँग्रेस कमिटी ही नवे मत स्वीकारावयाला असमर्थ ठरली. आणि अंग व उपांग यातील हा मतभेद छपविण्याकरिता विलायतेतील कमिटीने असा नवाच डौल मांडला की "आम्ही विलायतेतील सल्लागार हेच विलायतेतील चळवळ कशी करावी हे ठरविण्याचे धनी व मुखत्यार आहोत. इकडे काय लिहावे काय बोलावे याचे ज्ञान काँग्रेसवाल्याना नाही व असणे शक्य नाही. म्हणून आमचा सल्ला काँग्रेसने विलायतेतील कामापुरता तरी मानला पाहिजे. इंग्रजाने सांगावे व हिंदी मनुष्याने ऐकावे ही परंपरा सनातन आहे ती येथेच कशी मोडेल ? ब्रिटिश पार्लमेंटकडून जर तुम्हाला राजकीय सुधारणा मिळवा- वयाच्या तर त्या पार्लमेंटकडून कशा मिळवाव्या यांचे ज्ञान आम्हाला जितके आहे तितके काँग्रेसला असणार नाही. तात्पर्य काँग्रेसचे नाव जोडून घेतल्यामुळे ब्रिटिश कमिटी ही जरी कॉंग्रेस घटनेचे एक उपांग असे कोणास दिसले तरी, मूळ काँग्रेस- चीच स्फूर्ति आमच्या उत्पादकांकडून झालेली असल्यामुळे आम्ही मुख्य अंग व काँग्रेस हे उपांग असेहि म्हणणे शोभेल ! " पण हा युक्तिवाद कोण ऐकणार ? तिन्हाईताचे बोलणे आपल्याला पटले नाही तरी ते मुकाट्याने ऐकून घ्यावे लागते. पण द्रव्यसाधनाच्या दृष्टीने ब्रिटिश कमिटी व इंडिया पत्र ही पोष्य आणि काँग्रेस ही पोषक असा संबंध असल्यामुळे ब्रिटिश कमिटीचा हा युक्तिवाद सहज फिका पड्डू लागला. त्यातूनहि कमिटीचे मूळ उत्पादक ह्यूम वेडरबर्न हे निवर्तले. आणि त्यांची जागा घेणारे तितक्या जिव्हाळ्याचे लिवरल किंवा रॉडिकल पुढे येऊन लाभले नाहीत. कमिटीतील विद्यमान इंग्रजापैकी डॉ. क्लार्क हे जहालांचे पक्षपाती. जुने- पुराणे दोस्त. त्याना ब्रिटिश कमिटी व काँग्रेस यांच्यासंबंधाचे मर्म पटून कमिटीने निदान तटस्थ राहावे येथपर्यंत आपल्या मनाला त्यानी मुरड घातली. पण इंडिया पत्राचे संपादक मि. पोलॉक हेच एकटे असमंजस ठरले. ज्यानी काँग्रेस सोडली अशा नेमस्त पुढाऱ्यांच्या बळावर ते इंडिया पत्राच्या द्वारे काँग्रेसवरच उलटून टीका करू लागले. यामुळे खरा विरोध उत्पन्न झाला व चकमक झडली. काँग्रेसचे शिष्टमंडळ काही एक निश्चित हुकूम घेऊन आलेले आहे व त्याप्रमाणेच ते मत- द.वा. पोतदार कै. म. म. ग्रंथ संग्रह