पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० लो० टिळकांचे चरित्र भाग ५ येवढ्यामुळेच विलायतेत राजकीय चळवळ किती व कशी करता येईल या विषयीचा सामान्य माणसाचा अंदाज भरमसाट असतो. निदान मजूर- पक्षासारखा नवा पक्ष जोरात येईपर्यंत तरी हा अंदाज चुकीचाच ठरणार होता. विलायतेतला पूर्वीचा जहालपक्ष म्हणजे लिबरल पक्ष किंवा रॅडि- कल पक्ष. पण हिंदुस्थानासंबंधी त्याची मते इकडील नेमस्तांच्या मतापलीकडे जात नव्हती. आणि इकडील नेमस्तानाहि आपणाकरिता उद्या कोणी काही करील तर हाच पक्ष करील म्हणून त्याला चिकटून बसावे असे सहजच वाटे. कारण स्वराज्याचा निदान पहिला कायदा तरी ब्रिटिश पार्लमेंटच्या हातूनच होणार असे आपल्यातील नेमस्तांचेच काय पण जहालांचेहि मत आहे. आयरिश बंडवाल्यानीहि खून पाडून शेवटी ब्रिटिश पार्लमेंटातील प्रधानमंडळाच्या द्वारेच हल्लीचे मर्यादित स्वातंत्र्य मिळविले. अर्थात् लिवरल किंवा रॅडिकल हाच पक्ष जोपर्यंत सर्वात पुढारलेला व त्यातल्या त्यात अधिक उदारमतवादी असा होता तोपर्यंत त्यालाच धरून चिकटून राहणे हे नेमस्ताना स्वाभाविक होते. घेण्याची पाळी आली पहिलवान असे म्हणून त्यातल्या त्यात कम्युनिस्ट पण हिंदुस्थानात जशी जहालानाहि मवाळ म्हणून तशीच इंग्लंडातील लिवरल- जहालाना मवाळ व पडे घेण्याची पाळी आली. अर्थात् ही पाळी मजूरपक्षाने व पक्षाने आणली. म्हणून हिंदुस्थानातील जहाल पक्षाच्या पुढान्याना इकडे जसे एक पाऊल पुढे जावे असे वाटू लागले तसेच विलायतेतील चळवळीत देखील लिबरल पक्षाला धिःकारून मजूरपक्षाशी संबंध व संधान बांधणे त्याना योग्य वाटले. सुराला सूर आपोआपच भिडत असतो. इकडे नेमस्तानी साम्राज्यान्तर्गत स्वरा- ज्याची तार छेडावी व तिकडे विलायतेत लिबरल पक्षाने हिंदुस्थानातील सनद- शीर चळवळ करणाऱ्या, निदान मर्यादेत राहणाऱ्या, राजकीय पक्षाची स्तुति कराची हे जसे स्वाभाविक; तसेच इकडे स्वराज्य न मिळेल तर साम्राज्याचीहि गरज नाही असे म्हणणारा आणि सनदशीर चळवळीने भागत नसेल तर कायदा लाथाडणेहि योग्य ठरेल असे म्हणणारा पक्ष निघाला त्या बरोबर तिकडेहि संप वगैरे प्रतिकाराचे प्रकार प्रशस्त मानणारा वर्ग निघाला, आणि साम्राज्याच्या सद- तीने घरच्या जुलुमी भांडवलवाल्या प्रधानमंडळाचे बळ वाढते ते सहन न होऊन साम्राज्य हे स्वतंत्रतेला विषासारखे आहे असे म्हणणारा मजूरपक्ष निघाला. अर्थात् एकाच्या सुराला दुसऱ्याचा सूर आपोआपच भिडला. fare पक्षाविषयी टिळकांची जुनी कृतज्ञता नष्ट झाली नव्हती. ह्यूम वेडरबर्न कॉटन वगैरे गृहस्थांची किंमत ते ओळखून होते. पण लॅन्सबरी बेजवूड स्पूर क्लाइन्स असल्या नव्या लोकांचे पाठबळ मिळण्याचे चिन्ह दिसू लागले, व त्यांचा पक्ष म्हणजे मजूर पक्ष हा उदयोन्मुख आहे असे विलायतेतील लोकहि म्हणू लागले, तेव्हा टिळकांच्या मनावरील कृतज्ञतेचा पाश ढिला पडून राष्ट्रीय स्वार्थाकरिता त्याना मजूर पक्षाच्या पुढाच्याशी नाते जोडावे असे सहजच