पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ होमरुल लीगची स्थापना २९ आले. तेथील डि. काँ. कमिटीने एका वकिलाच्या दिवाणखान्यात बेळगाव शह- रच्या नागरिकांची जाहीर सभा भरविण्याचे ठरवून 'तुमची छाती असेल तर या जाहीर सभेस या ' असे राष्ट्रीय पक्षाला आव्हान केले. लोकाना ही थट्टा वाटली तरी सहज म्हणून शेदीडशे लोक सभेस गेले. खुद्द कन्व्हेन्शनवाले अवघे ८१९ होते. अर्थात् अध्यक्षाच्या निवडणुकीपासूनच विरोधाला सुरवात झाली. शेवटी छत्रे वकील यानी कबूल केले की 'जाहीर सभा बोलाविली ही आमची चूक झाली. ज्याना कन्व्हेन्शनची घटना मान्य असेल त्यानाच हे आमंत्रण द्याव यास पाहिजे होते.' शेवटी हा सर्व मजकूर सभेच्या वृत्तांतात लिहून ठेवून वाचून दाखविला तेव्हा बाकीचे सर्व लोक उठून गेले व कन्व्हेन्शनवाले तेवढे शिल्लक राहिले. त्यानी भरविलेली ही सभा पुण्यास जी नेमस्तांची प्रतिस्पर्धी प्रां. परिषद लवकरच भरणार होती तिला डेलिगेट निवडण्याकरिता होती. ही परिषद ता. १० जुलै रोजी पुण्यास भरली व ११ व्या तारखेला समाप्त झाली. या प्रां, सभेबद्दल नेमस्तांकडून २-३ महिने खटपट चालू होती. सभेस गव्हर्नरसाहेब त्यांची पत्नी कौन्सिलर्स हे काही वेळ आले होते. या सभेला प्रेक्षकसमुदाय फार थोडा होता. प्रतिनिधीहि थोडे होते. स्वागतकमिटीच्या अध्यक्षानी अखेर म्हटले की 'आमचा पक्ष अल्पसंख्याक असला तरी महत्वाचा आहे.' या परिषदेला नेमस्तानी १५ वी असे नाव दिले. पण नव्या घटनेखालची ती पहिलीच प्रांतिक सभा होती. पुण्यांत झालेल्या या दोन परिषदामुळे समेट आता होत नाही असे लोक सहजच बोलू लागले. या नेमस्तांच्या परिषदेत राजकीय टीकेचे विषय फारच थोडे घेतले गेले... शिवाय राष्ट्रीयांच्या सभेला निमंत्रण पाठविले असता कलेक्टर साहेब आले नाहीत . व दुसऱ्या सभेला स्वतः गव्हर्नरसाहेब आले यावरूनहि लोकानी काय अनुमान बांधावयाचे ते बांधले. (७) होमरूल लीगची स्थापना पुण्याच्या परिषदेत बॅ. बॅपटिस्टा यानी होमरूल हे आपले ध्येय करून त्याची मागणी करावी असे म्हटले होते व त्याकरिता एक वेगळा संघ आपण स्थापावा असे त्यांचे व टिळक यांचे बोलणे त्यापूर्वीच सुरू होते. काँग्रेसचा वाद सुरू असो वा नसो संयुक्त राष्ट्रीय सभा होवो वा न होवो. पण राष्ट्रीय पक्षाला संघटनात्मक असे चळवळीचे जे काहीतरी एक साधन असावे ते केवळ प्रांतिक नसावे आणि स्वराज्याची मागणी हाच त्याचा उद्देश असावा अशा सूचना होत्या. पूर्वी सुबाराव यांच्या बरोबर १९१४ साली मद्रासच्या काँग्रेसपूर्वी पुण्यास टिळकांचे जे संभाषण झाले त्यात 'आम्ही जरूर तर आमचा एखादा लीग काढू व होमरूलची मागणी करीत राहू आणि एखादे स्वराज्यविषयक बिल पार्लमेंट-: मध्ये आणवू' असे टिळक म्हणाले होते हे पूर्वी आलेच आहे. तात्पर्य लीगचा हा विचार आज ८-१० महिने सुरू होता. तथापि लीग प्रत्यक्ष काढला गेला नव्हता...