पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ दाला जागाच नव्हती. पण त्यानंतर हे ऐक्य टिकू शकले नाही. आणि बंगा- लच्या चळवळीपासून पुढे ब्रिटिश कमिटीच्या कामासंबंधाने इकडील लोकात दुमत होऊ लागले. ह्यूम वेडरबर्न दादाभाई कॉटन है नेमस्त हिंदी पुढाऱ्यांचे स्नेही आणि जुन्या पिढीचे लोक म्हणून राष्ट्रीय सभेत जहाल व मवाळ असा जेव्हा फरक पडू लागला तेव्हा या लोकांची सहानुभूति नेमस्तांकडे प्रगट होऊ लागली. सन १९०४ पर्यंत जहाल मवाळ हा भेद फारसा नव्हता. तोपर्यंत टिळक हे वेडर- बर्न कॉटन वगैरेना फार मानीत. पण पुढे नव्या मताना या जुन्या मित्राकडून पाठबळ मिळत नाही असे दिसून आल्यापासून टिळक ब्रिटिश काँग्रेस कमिटी - बद्दल व इंडिया पत्राबद्दल तक्रार करू लागले. विलायतेतील सर्वच युरोपियन स्नेही नेमस्तांचे पक्षपाती होते असे नाही. उदाहरणार्थ हाइंडमन डॉ. रुदरफर्ड वगैरे लोक जहालांचेच कैवारी असत. पण राष्ट्रीय सभेत जशी जहाल व मवाळ यांची रणे पडली तशी विलायतेत ब्रिटिश काँग्रेस कमिटीत पडली नाहीत. याचे कारण हिंदुस्थानातील चळवळीची पद्धत वेगळी व विलायतेतील वेगळी. दुसरेहि एक कारण असे की नेमस्त पुढारी हे स्वतः विलायतेस जाऊन व्याख्याने देत आणि ब्रिटिश कमिटीशी संबंध जोडीत व वाढवीत. त्याप्रमाणे नव्या मताचे पुढारी म्हणजे टिळक अरविंद घोष चित्तरंजन दास या लोकानी या बाबतीत नेमस्त पुढाऱ्यांचे अनुकरण केले नाही. त्याना विलायतेत चळवळ नको होती असे नाही. पण इकडे हिंदुस्थानात चळवळीचा मूळ ध्वनि उत्पन्न करण्यात त्यांची सर्व शक्ति व द्रव्यसाधन खर्च पडत असल्यामुळे विलायतेत त्या ध्वनीचा प्रतिध्वनि उमटविण्याचे त्यांचे काम ढिले पडे. उलट नेमस्त पुढारी हे प्रायः असे समजत की मूळ ध्वनि उत्पन्न करावयाचा तो विलायतेतील लोक- मतावर आणि त्याचा प्रतिध्वनि इकडे उमटवावयाचा. तिसरेही एक कारण असे की नवीन मताच्या पुढाऱ्याना विलायतेस जाऊन ती तिकडील लोकाना पटवून देणे ही साधी गोष्ट नव्हती. स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रीय उत्सव नि:- शस्त्र प्रतिकार असहकारिता सत्याग्रह करबंदी व काही मर्यादेपुरता सशस्त्र प्रति- कार या नव्या कल्पना तात्त्विक दृष्ट्या सुशिक्षित इंग्रज लोकाना बुद्धिगम्य असल्या तरी आपल्या राष्ट्राविरुद्ध हिंदी राष्ट्राने अमलात आणावयाच्या ही गोष्ट त्याना कशी पटावी ? राष्ट्रविशिष्ट किंवा नव्या कल्पनांचे केव्हांहि हे असेच आहे. गोवध आणि मिरवणुकीतील वाद्यवादन याकरिता आज हिंदुस्थानात रक्ताचे पूर वाहात आहेत. पण इंग्लंडात जाऊन यांचे मर्म इंग्रज लोकाना यथार्थपणे कोण समजावून देऊ शकेल ? बंगालच्या फाळणीने इकडे होमकुंड पेटविले. पण 'एका प्रांताचे दोन प्रांत केले' या कल्पनेत जहाल इंग्रजांची सिगारेट पेटण्याइतकीहि उष्णता नव्हती ! इंग्लंडात नॉन- कन्फॉर्मिस्ट लोक-शिक्षणविषयात सरकारशी भांडोत. पण सरकारची मदत न घेता सर्व शिक्षण आमूलाग्र खासगी प्रयत्नाने चालवावयाचे या कल्पनेत