पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलाययेतील चळवळीचे समालोचन ७७ वर्षांच्या अनुभवाने ही योजना निष्फळ आहे असे दिसून आले. इकडून जाण्याच्या रकमेपैकी सहा वर्षात एक लक्ष अठ्ठावीस हजार रुपये शिल्लक बाकी अंगावर राहिले. १९०१ साली तर ब्रिटिश कमिटीच्या कायम फंडातून सुमारे सहा सात हजार पौंड काढून भरावे लागले. हा कायम फंड हिंदुस्थानातच पण ह्यूम वेडरबर्न वगैरेंच्या प्रोत्साहनाने उभारण्यात आला होता. १९०२ साली ब्रिटिश कमिटीच्या देण्याची बाकी पूज्य करून दादाभाई नौरोजी यानी पुढील दोन वर्षांच्या खर्चाची हमी घेतली. व त्यानंतर राष्ट्रीय सभेच्या प्रतिनिधींच्या फीतून दरवर्षी परस्पर पैसे एकदोन रकमानी विलायतेत पाठविण्यात येऊ लागले. १८९४ पासून १९०३ पर्यंत दोन पासून तीन हजार पौंडापर्यंत रकम ब्रिटिश कमिटीच्या खचीकरिता दरसाल जात असे. १९०० साली मंजूर रक्कम साठ हजारावरून तीस हजारावर आली होती. पण दरसाल राष्ट्रीय सभा आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे पाठवीत असे. १९०४ साली 'इंडिया' पत्र हे एका वेगळ्या कंपनीच्या मालकीचे केले. ते पत्र कमिटीच्या चळवळी करिताच होते म्हणून कमिटीच्या हपिसाचा व लायब्ररीचा उप- योग इंडिया पत्राच्या संपादकाला व व्यवस्थापकाला होई. पण खर्चाच्या दृष्टीने ब्रिटिश कमिटी व हे वर्तमानपत्र यांची खाती वेगळी ठेवावी, तसेच काँग्रे- सच्या स्वागतमंडळाने प्रतिनिधीच्या निम्म्या फीची रक्कम ब्रिटिश कमिटीच्या खर्चीला पाठवावी आणि इंडियापनाचा खर्च त्याच्या कंपनीने भागवावा असे ठरले. पण या व्यवस्थेमुळे जमेचा अनिश्चितपणा टळला नाही. म्हणून १९१२ पासून वेगळी व्यवस्था करण्यात आली. ती अशी की काँग्रेसला पाठविता येईल तितका पैसा तिने पाठवावा व उरेल त्याची हमी काही हिंदी पुढाऱ्यानी घ्यावी. ही व्यवस्था १९१७ पर्यंतच चालू होती. १९१७ पासून ही हमीदारी बंद पडली. १९१३ व १९१४ सालात राष्ट्रीय सभा अगदी संपुष्टात आली. यामुळे त्या साली फारच थोडी रक्कम विलायतेस पाठविता आली. पण १९१५ पासून ही रक्कम पुन्हा वाढली. याचे कारण राष्ट्रीय- पक्ष टिळकांच्या प्रयत्नाने फिरून राष्ट्रीय समेत समाविष्ट झाला. यामुळे व इतर कारणानी राष्ट्रीय सभेला लोक अधिकाधिक जाऊ लागले आणि फीची रक्कम वाढली. यामुळे १९१५ साली १६०० पौंड १९१६ साली १५०० पौड १९१७ साली १६०० पौंड व १९१८ साली २२०० पौंड अशी रक्कम विलायतेस गेली. अशा रीतीने विलायतेतील चळवळीचा खर्च होता होईल तो राष्ट्रीय सभे- नेच भागविला. तथापि ही गोष्ट खरी की हिंदुस्थानातून पैसे पाठविण्याला केव्हा उशीर लागे व केव्हा तूट पडे त्यावेळी ब्रिटिश कमिटीतील लोकानी मधून मधून तात्पुरते आपल्या पदरचे पैसोहि पुढे करून खर्च भागविले व त्याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. परदेशाकरिता इतके तरी कोण करतो ? हिंदुस्थानात जोपर्यंत राष्ट्रीय सभेचे पुढारीपण नेमस्तांच्या हाती होते तोपर्यंत राष्ट्रीय सभेचे उपांग म्हणून ब्रिटिशकमिटीने जे काम केले त्यात मतभे-