पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ यांच्यासारखी श्रीमंती किंवा वरिष्ठवर्गात प्रवेश नव्हता. तथापि या सर्व गुणांची उणीव त्यानी आपल्या प्रामाणिकपणाने शीलाने परिश्रमाने अभ्यासाने आणि एकनिष्ठेने भरून काढिली होती. ह्यूमसाहेबानी राष्ट्रीय सभा इकडे स्थापन केली त्याप्रमाणे विलायतेत गेल्यावरहि हिंदुस्थानाकरिता खटपट केली. पण ते तिकडे गेले तेव्हाच वृद्ध झाले होते. आणि त्यांचा स्वभाव तापट बोलणे तुटस लिहिणे जहाल यामुळे त्यांचा धिम्या चळवळीला काही उपयोग झाला नाही. शिवाय हिंदी लोकांच्या आस्थेवाईकपणाविषयी त्यांची निराशा झाली होती यामुळे मधून मधून कडक शब्दांचे संदेश हिंदुस्थानाला पाठवून मद्दड हिंदी लोकांच्या पाठीवर जागृतीसाठी कोरडे ओढण्यापलीकडे त्यांच्या हातून फारसे काम झाले नाही. वेडरबर्न हे दादाभाईसारखेच सात्त्विक शांत. घरचे श्रीमंतहि. व समाजात वजनदार, तथापि त्यांच्या बुद्धिमत्तेचे किंवा वक्तृत्वाचे तेज त्यांच्या जात- भाईवर पद्धत नसे. म्हणून त्यांची खरी सेवा चिलावती वर्तमानपत्रातून मधून मधून लेख लिहिण्यापुरतीच होई. सर हेनरी कॉटन हे पेन्शन घेतल्यावर तिकडे गेले आणि त्यापूर्वीहि त्यानी पुस्तके लिहून हिंदुस्थानची वकीली केली होती. पण विलायतेत त्याना वेडरबर्नइतकी मान्यता नव्हती. विलियम डिग्बी हे हिंदुस्थाना- करिता झगडणारे होते. पण ते निर्धन आणि समाजात त्याना वजन मुळीच नसे. काही लोक तर त्याना हिंदुस्थानचे पगारी वकील म्हणत. व काही अंशी ते खरेहि होते. तथापि दादाभाई व ही इतर मंडळी यानीच, लिंबरलपक्षाच्या पंखा- खाली जाऊन का होईना, पण विलायतेतील चळवळीचा प्रारंभ केला. त्यांच्याच प्रयत्नाने इंडियन पार्लमेंटरी कमिटी स्थापन झाली व फॉसेटसारखे लोक हिंदु- स्थानच्या विषयात लक्ष घालू लागले. तथापि ब्रि० काँ० कमिटी किंवा इंडियन पाले- मेंटरी कमिटी असली तरी हिंदी लोकच शक्य तितके विलायतेस जावे व त्यांच्या हातूनच चळवळीचे कार्य व्हावे अशी इंग्रज स्नेही मंडळींची अपेक्षा व इच्छा होती. आणि ती बरोबरच होती. त्याप्रमाणे प्रथम दादाभाई नौरोजी यानी व नंतर गोखले यानी ते काम सतत व पद्धतशीर केले. इतर लोकांचा उपयोग मधून मधून कसा झाला हे वर सांगितलेच आहे. विलायतेतील या चळवळीला ह्यूम वेडरबर्न बगैरे लोकानी थोडीबहुत झीज सोसूनहि मदत केली. तथापि या चळवळीला पैसे हिंदुस्थानानेच पुरविणे योग्य होते व एकंदरीने पाहता तो बहुतेक पैसा राष्ट्रीय सभेनेच पुरविला. प्रथम १८९३ साली दादाभाई लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आले तेव्हा ब्रिटिश कमिटी आणि इंडिया वर्तमानपत्र यांच्याकरिता राष्ट्रीय सभेने दरसाल ६०००० रुपये विलायतेत पाठवावे असे ठरले. व त्याचा मोबदला म्हणून कमिटीने या पत्राच्या १०००० प्रतीपैकी काही तिकडे फुकट वाटाव्या व काही इकडे विक्रीला पाठवाव्या असे ठरले. हिंदुस्थानात इंडिया पत्राला दहा हजार वर्गणीदार मिळते तर सहा रुपये प्रमाणे ही ६०००० रुपयांची रक्कम सहज भरून निघती. सहा