पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील चळवळीचे समालोचन ७५ सचे नाव पुढे केले आणि काँग्रेसनेहि त्यांचे आभार मानून गौरव केला. या सर्व गोष्टी झाल्या. तथापि १९१९ साली काँग्रेसच्या नावाने जसे व जितके काम झाले तितके पूर्वी झाले नव्हते आणि पुढे तर ते बंदच पडले. आता विलायते- तील चळवळीचा मूळ उगम नेमस्त पक्षाच्या द्वारेच झाला यात शंका नाही. बाबू उमेशचंद्र बनर्जी सुरेंद्रनाथ बानर्जी लालमोहन घोष यानी आपल्या वक्त- त्वाने हिंदी मुत्सद्यांना तिकडे प्रतिष्ठा मिळवून दिली होती. बऱ्हाडचे मुधोळकर हेहि जाऊन आले होते. मद्रासेकडील रंगानंद मुदलीयार डॉ. नायर परमेश्वरं पिल्ले वगैरे मंडळी जाऊन त्यानी काही कार्य केले होते. मुंबईचे चंदावरकर यानी तिकडे काही व्याख्याने दिली होती. फेरोजशाह मेथा मात्र या भानगडीत फारसे पडले नाहीत. वेलची कमिशनच्या वेळी गोखले वाच्छा सुरेंद्रनाथ व सुब्रह्मण्यम् अय्यर यांचे शिष्टमंडळ जाऊन त्याने चांगले काम केले. विशेषतः ना. गोखले यांच्या तर, केवळ शिष्टाईकरिता म्हणून, विलायतेस चार खेपा झाल्या. व लिवरल मुत्सद्याना भेटून व व्याख्याने देऊन मुलाखती घेऊन जितके काही त्याना करता आले तितके त्यानी केले. आणि केले ते अर्थात पुष्कळच होते. लाला लजपत- राय हेहि मधून मधून विलायतेस जात. त्यांचाहि उपयोग बराच झाला. आणि बेझन्टबाईविषयी तर बोलावयासच नको. कारण त्या दर एक दोन वर्षांनी विला- यतेस जात व त्यांच्या प्रत्येक सफरीत त्यांच्या मताप्रमाणे व पद्धतीने हिंदुस्थानाला अधिक राजकीय हक्क मिळण्याबद्दल चळवळ होतच असे. वरील इतर लोकापेक्षा बेझन्टबाईचे महत्त्व विलायतेत अधिक मानले जाई व मतप्रसाराला जी साधने लागतात ती त्यांच्या इतकी इतर कोणालाहि अनुकूल नव्हती. आधी त्या जातीने इंग्रज, सुप्रसिद्ध ब्रँडलॉ साहेबांच्या बरोबरीने त्यानी मतस्वातंत्र्याची चळवळ ४०-४५ वर्षापूर्वी केलेली. व तेव्हापासून त्यांचे नाव प्रसिद्धीला आलेले. वक्तृत्वात तर त्यांचा हातखंडा विलायतेतील हि प्रसिद्ध वक्त्यात त्यांची गणना. अनेक वर्तमानपत्राशी त्यांचा संबंध आणि थिऑ- सॉफीच्या सांप्रदायात प्रत्यक्ष मिसळलेले किंवा दुरून त्याला सहानु- भूति दाखविणारे व त्याची चहा करणारे भाविक सधन व वजनदार असेहि काही लोक बाईंच्या पुढयात किंवा संग्रही नेहमी असावयाचे. यामुळे त्यातल्या त्यात एखाद्या मताबद्दल जर विलायतेत प्रसिद्धी मिळवावयाची असेल तर ते बेन्टबाईना जितके सुलभ तितके इतर कोणालाहि ते नव्हते. अशा रीतीने सर्वांनी विलायतेत यथाशक्ती चळवळ करण्याचे श्रेय पूर्वी संपा- दिले होते. पण याहि पेक्षा आणखी एक वेगळा वर्ग प्रामुख्याने सांगितला पाहिजे. तो म्हणजे दादाभाई ह्यूम वेडरबर्न कॉटन डिबी वगैरे आद्यांचा. दादाभाई है। हिंदी गृहस्थ असले तरी त्यांचा बहुतेक जन्म विलायतेत गेला व तोहि हिंदु- स्थानच्या वतीने भांडण्यात. त्यांच्यापाशी लालमोहन घोस किंवा गोखले यांच्या- सारखे मोहक वक्तृत्व नव्हते. फेरोजशाहसारखी रुबाबदारी नव्हती. वेडरबर्न