पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ मिळून चुकला होता. तात्पर्य या सर्व गोष्टींचा विचार करता टिळकानी स्वतःला काँग्रेसच्या शिष्टमंडळातून वगळले हे रीतीचेच झाले. लीगचे प्रतिनिधि म्हणून त्यांचा मान झाला किंवा अपमान झाला तरी तो लीगपुरता. इतरांचा त्यात काही संबंध नाही. शिवाय एकाला दोन व्हावे त्याप्रमाणे टिळकाना पार्लमेंटरी कमिटीपुढे साक्ष देण्याला स्वतंत्र मार्ग मिळ- ण्याचा तो मिळून पटेल वगैरे मंडळीनाहि पुढारीपणाने वावरण्याला मोकळीक झाली. काँग्रेसच्या शिष्टमंडळात अध्यक्ष किंवा पुढारी नेमण्याची पंचाईतच होती. दिवाण माधवराव हे वयाने वडील. परंतु त्यांच्याकडे यावेळी पुढारीपण देण्या- सारखे त्यांचे वय नव्हते. ते वडील पण वृद्ध, चपळ कार्यक्षम नव्हते. वरे इतर कोणाला अध्यक्ष किंवा पुढारी नेमले तर त्याच्या ठिकाणी सर्वेकपता नाही. पटेलसारखे गृहस्थ पदोपदी त्याना चिमटे घेणार आणि बरोबरीच्या इतर लोकाना हेवा वाटणार. याकरिता राष्ट्रीय सभेने काय किंवा स्वतः शिष्टमंडळाने काय अध्यक्ष किंवा पुढारी असा कोणीच नेमला नाही. आणि विठ्ठलभाई पटेल हे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांच्याच नावाने सर्व काम करण्यात आले. पण ज्याला अंतस्थ माहिती आहे त्याला हे ठाऊक आहे, व पटेलहि हे कबूल करतील की, टिळकाना विचारल्याशिवाय पटेल इकडची काडी तिकडे करीत नसत. या शिष्टमंडळाचे बरेच सभासद आपल्या सोयीप्रमाणे एकामागून एक आले. अगदी प्रारंभी असे पटेल केळकर दिवाण माधवराव हेच गेले. आणि पटेल हे सर्वाधिकारी असल्यामुळे त्यानी जाताच आपल्या नावाने काम- काज सुरू केले. पण टिळक हे त्यांच्यापूर्वी बरेच दिवस विलायतेत होते व त्यानी वर दर्शविल्याप्रमाणे काँग्रेसच्या डेप्युटेशनचा मार्ग आधीच रचून बांधून साफ करून ठेविला होता. आणि तेथील सर्व मंडळीत पटेल हे जर कोणाचे ऐकतील तर टिळकांचे असेच परस्परांचे संबंध होते. शिवाय पैशाची सत्ताहि टिळकां- च्याजवळ होती. कॉंग्रेसने शिष्टमंडळाच्या कामकाजाकरिता काही पैसे मंजूर केले होते पण ते थोडे होते. एकट्या पटेलशिवाय बाकीचे शिष्टमंडळाचे सभासद आपापल्या खर्चाने गेले होते. पण टिळकांच्या होमरूल लीगला भरपूर पैसा मिळाला असल्यामुळे लीगला आपल्या शिष्टमंडळाचा सर्व खर्च करता आला इतकेच नव्हे तर मजूर पक्षाला निवडणुकीच्या कामी मदत म्हणून तीस हजार रुपये टिळकाना एका रकमेने देता आले. आणि द्रव्यबळ हे कोणत्याहि चळ- वळीतील मुख्य बळ असल्यामुळे त्या बळाचा उपयोग टिळकाना पुष्कळच झाला. तात्पर्य, या वेळच्या विलायतेतील चळवळीत नाव काँग्रेसचे पण काम टिळक व पटेल यांचे अशीच खरी स्थिति होती. यापूर्वी हिंदुस्थानातून विलायतेस वेळोवेळी शिष्टमंडळे गेली. काही हिंदी पुढारी, त्याना अनुकूल झाले व इष्ट वाटले तेव्हा, आपापल्या खर्चाने जाऊन त्यानी व्याख्याने वगैरे दिली. त्यानी केव्हा आपले नाव पुढे दामटले तर केव्हा काँग्रे-