पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील चळवळीचे समालोचन ७३ अशा रीतीने एक काळ केवळ नेमस्त मते विलायतेत प्रसृत करण्याचा तर दुसरा काळ त्याच्या अगदी उलट म्हणजे विलायतेत मुळीच चळवळ न करण्याचा अमा होऊन गेला. फक्त १९१९ चा हा मधला एक काळ असा येऊन गेला की त्यावेळी राष्ट्रीय सभेच्या नावाने व त्यांतल्या त्यात हिंदुस्थानात जी पुढारलेली जहाल पण राष्ट्रसंमत अशी मते असतील ती विलायतेत शिष्टमंडळाच्या तोंडून सांगितली गेली. काँग्रेसच्या शिष्टमंडळात टिळकांचा समावेश टिळकानी स्वतः हरकत घेतल्यामुळेच करण्यात आला नाही. त्याचे खरे कारण असे की टिळक हे सर्वात मानाने वडील या दृष्टीने ते पुढारी बनून त्यांच्या नांवे मंडळाचा सर्व कारभार व पत्रव्यवहार चालणे हेंच रीतीचे ठरले असते पण काही नाही म्हटले तरी राजद्रोही म्हणून टिळकांचे नाव विलायतेत दूषित होऊन राहिले होते. टिळकाना पाहावे अशा इच्छेची माणसे देखील त्यांच्याकडे बुजन्या गुराप्रमाणे दुरून अंग चोरून तिरख्या डोळ्याने पाहात. आणि कारभार तर पडला पार्लमेंटरी अधिकाऱ्याशी. काँग्रेसच्या दरबारातहि बेझन्टबाईसारखे अनेक लोक असे होते की त्याना टिळकांच्या विशेष परिस्थितीमुळे काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे पुढारीपण टिळकाकडे नसावे असे वाटे. टिळक शिष्टमंडळात नसावे असे म्हणण्याचे धैर्य कोणाचे होत नसे. पण ते त्यात असावे किंवा त्यानी त्यात पुढार- पण घ्यावे असा प्रश्न निघाला असता हे लोक आडपडद्याने बोलून नकार देऊन ती सूचना मोडून काढीत. टिळकाना या सर्व गोष्टी माहीत होत्या. त्यांच्या मते सार्वजनिक हिताच्या दृष्टीने पाहता चिरोल केस आपणाविरुद्ध गेल्याने बरोबर म्हणा चूक म्हणा पण विलायतेतील लोकमत आपल्याविरुद्ध होऊन राहिलेले आहे तेव्हा आपला व्यक्तिदोष राष्ट्रकार्याला बाधू देणे योग्य नाही, त्यातल्या त्यात शिष्टमंडळाचे काम म्हणजे एक प्रकारे बारभाईची खेती, त्यात मतभेद हे असावयाचेच, तेव्हा अशा कामात पडण्यापेक्षा होमरूल लीगचा सवता सुभा आपल्याला अनायासे मिळाला आहे त्यातच आपले काम स्वतंत्रपणे मनाला पटेल तसे करून घ्यावे. होमरूल लीगच्या शिष्टमंडळात मतभेद मुळीच नव्हता. निदान टिळक म्हणतील तसेच मनोभावाने वागणारे लोकच त्यात होते. होमरूल लीगची सर्व संघटनाच टिळकानी स्वतःच्या प्रयत्नानी केली होती. आणि लीगचे सगळे द्रव्यबळ त्याना म्हणून दौरे काढून एकवटता आले. अर्थात होमरूल लीगनेहि त्या सर्व पैशाचा विनियोग करण्याचा अधिकार आणि होमरूल लीगच्या नावाने विलायतेत जो कारभार करावयाचा त्याचा सर्व अधिकार मुद्दाम ठराव करून एकट्या टिळकांकडे सोपविला होता हेहि स्वाभाविकच झाले. बरे ज्या काँग्रेसच्या नावाने टिळक शिष्टमंडळात काम करणार त्या काँग्रेसचे अध्यक्षच त्याना आदल्या वर्षी निवडण्यात आले होते. तेव्हा मानसन्मानाच्या दृष्टीनेच पाहिले तर काँग्रेसच्या राज्यातील मान त्याना मिळावयाचा तो सर्व