पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ विण्यात आले. याहून अधिक कोणाची साक्ष घेतली नाही. टिळकांचीहि साक्ष झाली पण ती त्यांच्या होमरूल लीगतर्फे झाली. याशिवाय शिष्टमंडळाने जाहीर सभा भरवून व्याख्याने देणे अधिकारी व पार्लमेंटचे सभासद यांच्या गाठी घेणे हीहि कामे केली. या सभाकरिता एकंदर ५०० पौंड खर्च आला. अधिक पैसा गांठी असता तर अधिक सभा करता आल्या असत्या. शिष्टमंडळ विलायतेस जाण्यापूर्वी टिळकानी होमरूल लीगतर्फे यातले बरेच काम आधी केले होते. व होमरूल लीगच्या पैशाचा उपयोग राष्ट्रीय सभेखातर व तिच्या नावानेहि करण्यात येत असे हा मोठाच फायदा झाला. टिळकानी लंडन इंडियन असोसिएशन ब्रिटन अॅन्ड इंडिया फेबियन सोसायटी नॅशनल लिबरलक्लब वगैरे संस्थातून चळ- बळ केल्यामुळे काँग्रेसच्या कामाची पूर्वतयारी होऊन राहिली होती. तसेच दिल्लीची रा० सभा व शिष्टमंडळाचे आगमन यांचे दरम्यान ३/४ महिने टिळ- कानी राष्ट्रीय सभेचे हेतू व सुधारणांची मागणी ही विलायतेतील लोकाना सम- जावून सांगण्याची खटपट चालविली होती. हाहि राष्ट्रीय सभेला फायदाच झाला. "काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विलायतेस येताच स्टेटसेक्रेटरीची भेट घेतली. व त्यांच्याशी काही खाजगी चर्चाहि झाली. मजूर पक्षाने पार्लमेंटच्या इमारतीत शिष्ट- मंडळाला एकदा मेजवानीला बोलाविले व फिरून एकदा उपहाराला बोलाविले. या प्रसंगी निरनिराळ्या अधिकाऱ्यांच्या गाठी पडून बराच विचारविनिमय करता आला. शिष्टमंडळाने होता होईतो विलायतेतील सर्व राजकीय पक्षाशी संबंध ठेव- ण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांतल्यात्यात मजूरपक्षाशीच तो विशेष जडूं शकला. याचे कारण स्वराज्य व स्वातंत्र्य यांची या पक्षाला जन्मसिद्ध अभिरुचि आहे. लान्सबरी बेजवुड व स्पूर यांची मदत विशेष झाली. आणि स्पूर हे तर पार्लमें- टरी कमिटीचेच एक सभासद होते. "विलायतच्या आपल्या मुक्कामात मंडळान रौलेट अॅक्ट पंजाबातील अत्याचार वगैरे बद्दलहि चळवळ केली. मतप्रसारार्थ टिळकानी शिष्टमंडळ येण्यापूर्वी स्वयंनिर्णयावर एक पत्रक लिहून त्याच्या हजारो प्रती लोकात बाटल्या होत्या. व त्याचा सर्व खर्च टिळकानीच केला होता. शिष्टमंडळ आल्यावर त्यानेहि आपली ५/४ पत्रके छापून वाटली. एकंदर प्रती सुमारे पन्नास हजार वाटल्या गेल्या. तसेच मुंबईच्या स्पेशल काँग्रेसच्या रिपोर्टाच्या एक हजार प्रती मोफत वाटण्यात आल्या. 33 यानंतर शिष्टमंडळाने विलायतेतील चळवळीचे काम पुढे कसे चालवावे याविषयी काही सूचना केल्या होत्या. पण त्यांचा तपशील देण्यात अर्थ नाही. कारण त्या अमलात येण्याला फारसा अवसरच मिळाला नाही. पुढच्याच साली असहकारिता सुरू झाली व त्याचा पहिला धक्का विलायतेतील चळ- 'वळीला बसला. ब्रि० कमिटी मोडली. इंडिया पत्र बंद पडले, आणि विला- यतेत चळवळ करून सहानुभूति मिळविणे हे नव्या धर्मशास्त्राने पाप ठरविले !