पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील चळवळीचे समालोचन ७१ स्वातंत्र्याचा हट्ट तूर्त धरण्याचा आमचा विचार नाही. बेझन्टबाईनीहि जवळ- जवळ असेच सांगितले. त्यावरून या दोन शिष्टमंडळांची एकवाक्यता होणे शक्य नाही असे डॉ. क्लार्क यानी ठरविले. पण प्रि० कमिटीतील हिंदी सभासदांचा कल कॉंग्रेस डेप्युटेशनकडे होता. तेव्हा शिष्टमंडळाने इंडिया पत्राला आपले धोरण काँग्रेसप्रमाणे राखण्याला स्पष्ट शब्दानी नोटीस दिली. इकडे इंडिया- पत्राच्या डायरेक्टरानी त्या पत्राने रा० सभेचेच धोरण स्वीकारले पाहिजे असे संपादकाला कळविले. नंतर कमिटीच्या सभेत बहुमताने इंडियापत्राच्या डायरे- क्टर लोकांचा ठराव मान्य करण्यात आला व पत्राचे संपादक मि. पोलाक याना तो कळविण्यात आला. तेव्हा आपले काही चालत नाही असे पाहून पोलाक यानी आपल्या जागेचा राजीनामा दिला. यावेळी पोलाक यांच्या हाताखाली मिस् नॉरमॅन्टन या दुय्यम संपादकाचे काम करीत होत्या त्याना डायरेक्टरानी पोला यांचे जागी तात्पुरते नेमले व केळकर हे विलायतेत असेपर्यंत त्यानी इंडिया- पत्राच्या संपादकाचे काम करावे असेहि ठरविले. इंडिया हे पत्र स्वतंत्र असल्या- मुळे, म्हणजे त्रि. कमिटीच्या मालकीचे नसल्यामुळे, त्याची ही अशी व्यवस्था होऊ शकली. पण त्रि० कमिटी स्वतःचे धोरण बदलीना. फक्त तिने प्रत्येक शिष्ट- मंडळातर्फे नेमलेला एक गृहस्थ कमिटीत सामील करून घेण्याचा ठराव केला. तेव्हा पटेल यानी कमिटीला लिहिले की "तुम्हाला अशा रीतीने सर्वाशी सहकारिता करिता येत नाही. तुमची कमिटी ही रा० समेचे एक उपांग आहे. म्हणून त्या सभेच्या धोरणाप्रमाणेच तुमच्या कमिटीने वागले पाहिजे. नाही तर कमिटीच्या लोकानी राजीनामे द्यावे. वास्तविक ब्रि० कमिटीला घटना अशी काहीच नव्हती. यामुळे तिला हवे तसे वागता येई. हे पाहून शिष्टमंडळाने कमिटीकरिता एक घटना तयार केली व ती कमिटीपुढे ठेविली. डॉ० रुदरफर्ड हे काँग्रेसच्या मताचे आधीपासूनच होते. व गोष्टी इतक्या थराला आलेल्या पाहून डॉ० क्लार्क देहि मग वळले. नवीन घटनेप्रमाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा कमिटीत समावेश झाला व त्यामुळे कमिटीत काँग्रेसच्या बाजूचे बहुमत कायम झाले. तसेच यापुढे इंडिया पत्राचा संपादक हिंदी असावा त्याची नेमणूक कॉंग्रेसने करावी व त्याला सालीना ३५० पौंड पगार द्यावा असे ठरले. आणि इंडिया पत्राच्या कामात सल्लामसलत देण्याकरिता एक कमिटी नेमण्यात आली. कमिटीच्या हाती खर्चाची आगाऊ तजवीज असावी म्हणून कॉंग्रेसने सुरवातीलाच एकदा कमिटीला २५०० पौंड द्यावे तिने ते बँकेत ठेवून खर्च करावा आणि दरवर्षी काँग्रेसने तितकी नवी रक्कम पाठवीत जावी असेहि ठरले. " शिष्टमंडळाचे हे फक्त एक काम झाले. पण आणखीहि तीन कामे त्याने केली. पहिले ब्रिटिश पार्लमेंटरी कमिटीपुढे साक्ष देणे. या कामी शिष्टमंडळापैकी प्रत्येक गृहस्थाची साक्ष घ्यावी असे आम्ही सरकारला लिहिले. पण सर्वांची न घेता पटेल व दिवाण माधवराव एवढ्यांचीच साक्ष घेऊ असे आम्हाला कळ-