पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

06 लो० टिळकांचे चरित्र (५) विलायतेतील चळवळीचे समालोचन भाग ५ वर दिलेल्या कागदपत्रांवरून टिळक विलायतेत गेल्यापासून परत येईपर्यंत तेथे त्यानी काय केले व त्यांच्यासंबंधाने काय घडले याची कल्पना वाचकाना आलीच असेल. पण या तुटक कागदपत्रावरून ध्यानात न येणाऱ्या विलायतेतील चळवळीच्या धोरणाविषयी काही गोष्टी थोडक्यात संकलित रीतीने खाली देऊन हे प्रकरण संपवितो. टिळक विलायतेचा मुक्काम संपवून हिंदुस्थानात परत येण्याकरिता ता० ६ नोव्हेंबर १९१९ या दिवशी 'ईजिप्त' नामक वोटीवर बसले. त्या आधी तीन दिवस काँग्रेसच्या शिष्टमंडळाची सभा लंडन येथे ता. ३ नोव्हेंबर १९१९ रोजी भरली व त्याने अमृतसरच्या कॉंग्रेसकडे कामाचा अहवाल पाठविला. त्याचा सारांश असा:- " शिष्टमंडळात प्रथम निवडलेले असे एकंदर सभासद म्हटले म्हणजे दिवाण माधवराव खापर्डे पटेल हसन इमाम केळकर बिपिन पाल व ए. रंगस्वामी अय्यं- गार हे होते. टिळक हॉर्निमन व डॉ. मेहता हे मागाहून सामील करण्यात आले. व अगदी अखेर डॉ. साठ्ये व चैचय्या हे समाविष्ट झाले. ब्रि. काँ. कमिटीचे काम व इंडिया पत्राचे धोरण ही रा० सभेच्या धोरणाला मिळती करून घेण्याचे शिष्टमंडळाकडे पहिले काम होते. आम्ही येताच कमिटीशी बोलणे सुरू केले. 'इंडियापत्र' नेमस्त लोकांचे विचार पुढे मांडीत होते आणि हिंदुस्थानातील लोक- मत लक्षात न घेता कमिटीने ८ जुलै १९१८ रोजी माँटेग्यू चेम्सफर्ड रिपोर्टाला पूर्ण संमति देऊन टाकली. त्यामुळे रा० सभेने त्रि. काँ० कमिटीला पैसे पाठविण्याचे थांबविले. ता. २६ फेब्रुवारी १९१९ रोजी खासगी रीतीने बोलणे झाले त्या टिळकानी वि. कमिटीला प्रश्न टाकला की दिल्ली येथील रा० सभेच्या ठरावांचे समर्थन तुमची कमिटी व तिचे मुखपत्र करणार की नाही ! त्यावेळी तिकडून शिष्टमंडळ आले नव्हते. म्हणून डॉ. क्लार्क यानी असा गुळमुळीत जबाब दिला की ते मंडळ येईपर्यंत आम्ही फार तर तटस्थ वृत्ति ठेवू. यामुळे टिळकांची निराशा झाली व ते शिष्टमंडळाची उत्सुकतेने वाट पाहू लागले. आम्ही विलायतेस गेल्यावर कमिटीने प्रथम आमची व नंतर नेमस्तांच्या शिष्टमंडळाची गाठ घेतली. व तूर्त दोन्ही शिष्टमंडळाना कमिटीचे हपीस व लायनरी ही खुली ठेवावी असे ठरले. पटेल यानी आपल्या कामाला कमिटीची मदत मागितली तेव्हा डॉ. क्लार्क यानी उत्तर दिले की 'खुद्द रा० सभेतच ज्या अर्थी मतभेद झाला आहे त्याअर्थी त्रि० कमि- टीहि होता होईतो तटस्थ राहील व सर्व शिष्टमंडळांचा एक विचार करण्याची खटपट करील.' ता. १८ जून १९१९ रोजी कमिटीने नेमस्त शिष्टमंडळाची भेट घेतली तेव्हा सुरेंद्रनाथ बानर्जी यानी सांगितले की आम्ही माँटेग्यूसाहेबांच्या बिलाना संमति देणार. द्विदलराज्यपद्धति तूर्त आम्हाला चालेल आणि प्रांतिक