पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ५ निवडक कागदपत्र (१४०) लाला लजपतराय यांचे टिळकाना पत्र न्यूयॉर्क ( बिनतारखेचे) ६९ तुमचे पत्र पावले. या देशातील काम असेच पुढे चालू ठेवावे हा तुमचा अभिप्राय बरोबर आहे. लंडनच्या खालोखाल आज न्यूयॉर्कला महत्त्व आहे. तुमच्या हाताखालील एखाद्या चांगल्या गृहस्थाला इकडे काम करण्यास पाठ- विल्यास बरे होईल. त्याचा खर्च भागविण्याची व्यवस्था येथे करिता येईल. मनुष्य पाहिजे तो अशाकरिता की तो स्वतंत्र बुद्धीचा व कुशल हवा. थोडासा तत्त्वनिष्ठहि पाहिजे. कामाला मिळेल ते साधन ओरखाडावयाचे ही पद्धत बरी नसते. जाहीर रीतीने आपण जी विधाने करितो ती व्यवस्थित असली पाहिजेत. त्यात अतिशयोक्ति नसावी. खर्च पुष्कळ लागतो खरा तथापि त्यातहि काटकसर करण्याची बुद्धि हवी. अशा मनुष्याच्या हाताखाली डॉ. हर्डीकर हे फार चांगले काम करतील. गेल्या पांच वर्षाच्या हद्दपारीने हिंदुस्थानला परत जावे असे मला फार वाटू लागले आहे. आणि संधि मिळताच मी जाण्याचा विचार केला आहे. कारण माझी प्रकृति आता येथे बरी नाही. तुम्ही पाठविलेल्या रकमेचा मी अगदी काटकसरीने उपयोग केला. तुमचे चार हजार डॉलर जवळ जवळ तसेच ठेविले आहेत व बहुतेक खर्चाची तजवीज परस्परच केली आहे. स्वतः तुम्हाला इकडे येता न आले तर केळकर किवा दुसरे कोणीतरी गृहस्थ इकडे पाठवा. येथील काम पुढे चालू ठेविले पाहिजे कारण पुष्कळ परिश्रमाने व धोके सोसून आता- पर्यंत ते चालविलेले आहे. बेझंटवाई इकडे येणार असे ऐकतो हे खरे काय ? माझे पुस्तक छापण्यास दिले आहे. हजार प्रतींचा खातरजमा देऊ शकत नाही पण पाचशे प्रति विकण्याची हमी घेऊ शकेन. कसेहि असले तरी पुस्तक लवकर बाहेर पडावे असे मला वाटते. . (१४१ ) लाला लजपतराय यांचे टिळकाना पक्ष न्यूयॉर्क ( बिनतारखेचे ) तुमचे पत्र सेन्सॉरने फोडून पाठविले. पण दुसरे पुडके फोडले नाही. तुमच्या पत्रकाला एक पान आणखी जोडून आम्ही त्याच्या ५००० प्रती काढून सर्व मोठमोठ्या लोकाना आणि वर्तमानपत्राना वाटणार आहो. आणखी लाग- तील असे वाटल्यास आणखी छापू. तेथील तुमच्या कामाचा अहवाल वाचून आनंद झाला. ब्रिटिश काँग्रेस कमिटीला व्यर्थ पोसले आहे. तो एक पांढरा हत्ती आहे. तितक्या पैशात अमेरिकेत कितीतरी काम झाले असते. तुम्ही पाठवलेल्या पैशापैकी आम्ही फक्त ५०० पौंड आतापर्यंत खर्चले. येथील आमची पद्धति अशी:- हिंदुस्थानासंबंधाची योग्य ती माहिती फक्त पत्रकातून द्यावी. उगाच इंग्रजसरकारवर हल्ला करणारी भाषा पत्रकातून योजू नये. कारण पत्रक वाचल्या- बरोबर त्याविषयी ग्रह चांगला व्हावा.