पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो० टिळकांचे चरित्र भाग १ स्वार्थाच्या दृष्टीनेहि इंग्रजांचा जय होणे आम्हाला श्रेयस्कर. कारण त्यांच्यापासूनच स्वराज्य मिळण्याची आम्हाला आशा. " गोखले याच्या मृत्यूसंबंधाचा दुसरा ठरावहि टिळकानीच माडला. ते म्हणाले 'गोखले यांच्यासारख्या तरुण मनुष्याच्या मृत्यूसंबंधी दुखवट्याचा ठराव माडण्याचे काम माझ्यासारख्या त्याच्याहून वडील माणसाकडे यावे याचे वाईट वाटते. ' याचा उघडच अर्थ असा की मी आधी व नंतर गोखले मृत्यू पावणे योग्य होते. या एका वाक्यावरूनच गोखलेटिळकांच्या गोवऱ्या नदीवर गेल्या आहेत या गोखल्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या टिळकांच्या वाक्याचा अर्थ खरोखर कसा घ्याव- याचा हे कळून येण्यासारखे आहे ही गोष्ट जाता जाता सांगितली पाहिजे. 'मी सर्व वहिष्कारवादी नाही कारण माझे लोक स्थानिक स्वराज्यात व कायदेकौन्सिलात काम करीत असून त्याला माझी संमति आहे.' हे जे वाक्य टिळकानी बेझन्ट बाईना तारेने समेटाच्या वादात कळविले त्याचे स्वारस्य व्यक्त करणारा असाहि एक ठराव या सभेत झाला. केळकर हे मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीस पूर्वी उभे राहिले असता मुंबई सरकाराने त्यांची उमेदवारी निष्कारण रद्द केली तरी त्या गोष्टीचा निषेध करून मुंबई सरकारने केळकरांवर मारलेला अपात्रतेचा शिक्का काढून टाकावा असा तो ठराव होता. टिळक हे जर खरोखरी सरकारावर बहिष्कार घालणारे असते तर असा ठराव या राष्ट्रीय पक्षाच्या परिषदेत कोणी सुचविला नसता हे उघड आहे. शेवटी पुढील परिषद बेळगावास भरावी अशा विषयी वेळवी यानी निमंत्रण दिले. अशा रीतीने ही परिषद उत्तमरीतीने पार पडली. स्वागतसभेचे सभासद ४०० झाले होते. ९६० प्रतिनिधी आले फी भरून तिकीट काढून एक हजार प्रेक्षक आले. यावरून परिषद भरविण्याच्या या उपक्रमाला लोकांची किती मदत होती हे सहजच दिसून येईल. १९०९ ते १९१४ सालापर्यंत भरलेल्या कोणत्याही नेमस्त कांग्रेसला इतका समाज नसेल ! परिषदेच्या या यशाचा परिणाम इतर प्रातांतील राष्ट्रीय पक्षावर तर झालाच पण नेमस्तांवरहि झाला. कन्व्हेन्शनच्या शिक्क्याशिवाय प्रातिक परिषदेचे नाणे खरे ठरणार नाही या समजुतीने मुंबई प्रा. कां कमिटीने आपली टांकसाळ बंद ठेविली तरी जनतेचे अडत नाही ही गोष्ट सिद्ध झाली. आणि राष्ट्रीय पक्षाला कांग्रेसमध्ये येण्याला घटनेत काही तरी अधिक सोयी तुम्ही कराव्या हेच आता अपरिहार्य होय अशीहि गर्भित सूचना पुण्याच्या परिषदेच्या यशात होती. इतकेच नव्हे तर समेटाचा पुढेहि प्रयत्न : व्हावा याकरिता परिषदेत टिळक बॅपटिस्टा व बेळवी यांची एक कमीटीहि नेमण्यात आली. टिळकानी केसरीत लिहिले की 'प्रांतिक सभा राष्ट्रीय सभे- पासून भिन्न राहू इच्छिते असे आता कोणी अनुमान करील तर ते चुकीचे आहे. ' राष्ट्रीय पक्षाच्या परिषदेशी स्पर्धा करावी म्हणून नेमस्तानीहि आपली परि- षद भरविण्याचे ठरविले. पण कन्व्हेन्शनवाले व राष्ट्रीय पक्षाचे लोक यांचे प्रमाण बहुधा प्रत्येक ठिकाणी किती असते हे नेमस्ताना बेळगाव शहरात लवकरच दिसून