पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- 1083 ટ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ लोकांचे हित ध्यानात बाळगले पाहिजे. त्या लोकाना कसे वागविले जाईल यावरच त्यांची इकडे परीक्षा होईल. (१३६ ) हाइंडमन यांचे टिळकाना पल लंडन ८ नोव्हेंबर १९१९ हातून होईल ती खटपट हिंदुस्थानाकरिता करीत असतो. हिंदुस्थानच्या नव्हे पण आमच्या देशाच्या परीक्षेचीच वेळ आहे. आज प्रत्यक्ष चिन्हे फार आशाजनक नसली तरी साम्राज्याविरुद्ध असलेल्या भावनेला हळूहळू भरती येत आहे. तुम्हीच काय पण आम्हा इंग्रज लोकानाहि शीड उभारून आता निघाले पाहिजे. आहोत असे राहून आमचेहि यापुढे चालणार नाही. (१३७ ) हेंडरसन यांचे टिळकाना पत्र लंडन २२ नोव्हेंबर १९१९ बिलाला उपसूचना आम्ही देणार आहोत. आमच्या पार्लमेंटरी पार्टीने तसे ठरविले आहे. फक्त जाणत्या लोकानीच बोलणे इष्ट म्हणून भाषणे करण्याचे काम निवडक माणसाकडे देऊ. ( १३८) खापर्डे यांचे टिळकाना पत्र लंडन २५ नोव्हेंबर १९१९ सर विलियम वार्टन हे आजारातून उठले आहेत. पुढील महिन्याच्या ३ तारखेपर्यंत बिल ढकलले गेल्यामुळे ते काही उपसूचना मांडतील व सर्वावर आपल्यासारखे मत देतील. मॅकलम् स्कॉट तसेच करतील. दोघानाही उपसूचना समजावून दिल्या आहेत. (१३९) पटेल यांची टिळकाना तार लंडन १५ डिसेंबर १९१९ पार्लमेंटमधील आपल्या तेहीमंडळीनी चांगली मदत केली. बेझन्ट व शास्त्री यानी काँग्रेसच्या विरुद्ध येथे चळवळ केली नसती तर ही मदत अधिकच झाली असती. सुधारणाना अनुकूल अशा तारा इकडून प्रसिद्ध होतील त्याविषयी सावध राहा. इंदुलाल याशिक हे कॉंग्रेसचे जॉईन्ट सेक्रेटरी व इंडियापत्राचे संपादक नेमता आले तर पहा. काँग्रेसचे ऑफिस मुंबईस येण्याची काही खट- पट करा.