पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ६७ उदारपणाचा आहे व त्याचा मोबदला खचित मिळेल. लवकरच साम्राज्यातील स्वराज्य भोगणान्या इतर भागाप्रमाणेच हिंदुस्थानाला हक्क मिळतील अशी आम्हाला आशा आहे. (१३३) लॅन्सबरी यांचे टिळकाना पत लंडन ४ नोव्हेंबर १९१९ तुम्ही येथे होता त्या अवधीत तुमच्या बरोबर काम करण्याचा मान व आनंद ही दोन्ही मला लाभली याबद्दल आनंद वाटतो. तुमची निष्ठा खरोखर अपूर्व आहे. या देशातील तुमची चळवळ न थांबावी असे तुमचे प्रयत्न झालेले आहेत. आम्ही 'डेली हेरल्ड' पत्राची संपादक मंडळी व आमचा पक्ष हिंदुस्थानाकरिता होईल तितकी खटपट करू. केवळ राज्यमंडळे वेगळी म्हणून तुम्ही आम्ही वेगळे. बाह्योपाधी वेगळ्या म्हणूनहि वेगळे. पण अंतर्यामी तुम्ही आम्ही एक आहोत. मी हिंदुस्थानात केव्हा येईन तो येवो पण मी येईन तेव्हा हिंदुस्थान हे वसाहतीसारखे स्वतंत्र झालेले दिसावे अशी माझी इच्छा आहे. (१३४) लॅन्सबरी यांचे बॅपटिस्टा याना पत्र लंडन ४ नोव्हेंबर १९१९ xxx स्वयंनिर्णयाकरिता डेली हेरल्ड हे पत्र नेहमी झगडत राहील. पण अत्याचाराचे धोरण त्याला मंजूर नाही. xxx (१३५) वेजवुड यांचे टिळकाना पत्र लंडन ६ नोव्हेंबर १९१९ विलायतेस शिष्टमंडळ आल्यामुळे उभयपक्षी निकट परिचय होण्याला फार मदत झाली. इकडे आता वर्णद्वेष हटत चालला आहे. व हिंदुस्थानातहि यापुढे फार दिवस गोऱ्या लोकांचा उन्मत्तपणा चालणार नाही. सुधारणांचे विल अनुदार आहे. आणि त्यामुळे तुमच्यापेक्षा आमचेच थोडे अधिक नुकसान आहे असे मी म्हणतो. पण हिंदुस्थानाने त्याचा उपयोग करून चळवळ केली पाहिजे. त्यावर बहिष्कार घालणे हे घातक होईल. मजूर पक्षाच्या आधारावरहि राहणे फारसे शहाणपणाचे होणार नाही. उद्या मजूर पक्षाचे प्रधानमंडळ झाले तरीहि तेच. स्वतःच्या पक्षासंबंधाने मी तुम्हाला असे लिहिताना वाईट वाटते. पण या पक्षात झाले तरी ध्येयवादी असे लोक फार थोडे आहेत. ज्यात आमचा फारसा संबंध नाही त्यात आमच्याकडील मतदार फारसे लक्षच घालीत नाहीत. ध्येय वादीच असतात ते परक्यांच्या कामी लक्ष घालतात. किंवा इंग्लंडच्या लोकाना एक भीति तरी उत्पन्न झाली पाहिजे ! तुमच्या कौन्सिलानी यापुढे अस्पृश्य मागासलेल्या टि० उ... २९