पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ गेल्या शनिवारी आल्वर्ट हॉलमध्ये मोठी सभा होमरूलसंबंधाने झाली. झन्टबाईच्या मंडळीनी तिची मुख्यतः व्यवस्था केली होती. लॅन्सबरी अध्यक्ष होते. टिळकाना निमंत्रण केले होते. पण तेथे ठराव काय काय येणार हा प्रश्न होता. केवळ हल्लीच्या बिलाला पाठिंबा देणार असाल तर मी येत नाही असे टिळकानी कळविले. तेव्हा हिंदुस्थानाला त्वयंनिर्णयाचा हक्क असावा असा सर्व- समावेशक ठराव पुढे आणण्याचे आश्वासन मिळाले. तेव्हाच टिळक सभेला गेले. पण हॉर्निमन व चमनलाल यानी सभेला हजर राहून अगदी उलट्या अनपेक्षित दिशेने खेचले. त्यानी उपसूचना आणिली की हल्लीचे बिलच्या विलच अजिबात रद्द करावे. पण सभेच्या मूळ उद्देशाला सोडून ही उपसूचना असल्यामुळे लान्स- बरी यानी ती पुढे आणूच दिली नाही. टिळकानी त्यांच्या निश्चित धोरणाप्रमाणे बिल असमाधानकारक म्हणून त्यावर टीका केली आणि उपसूचना अप्रयोजक म्हणून तिजवरहि त्यानी टीका केली. बेझन्टबाई समंजस, बिलासंबंधाने त्यांचे व टिळकांचे मम तंतोतंत जुळणारे नव्हते तथापि बिलातील दोष दाखवीत दाखवीत त्यानी त्याचे फक्त ओझरते समर्थन केले. पण मुख्य भर स्वयंनिर्णयावर दिला. टिळकांचे भाषण या सभेत फारच चांगले झाले. लॅन्सवरी वगैरेनी त्याची फार वाहवा केली. या आठवड्यात कॅक्स्टन हॉलमध्ये डॉ. क्लार्क यांचे अध्यक्षतेखाली त्रि. कमिटीने सभा भरविली होती तीत शिष्टमंडळाच्या विलायतेतील कामाची प्रशंसा केली गेली. गुरुवारी मि. स्पूर यानी शिष्टमंडळाला फराळाला बोलाविले. यावेळी पार्लमेंटचे अनेक सभासद आले होते. सिलेक्ट कमिटी आपला रिपोर्ट लिहिण्यात गुंतली आहे. बिल दुसन्या वाचनाकरिता डिसेंबरात पुढे येईल. तेव्हा त्याला उपसूचना काय द्याव्या हे आम्ही ठरविले आहे. येथून निघण्यापूर्वी होमरूल लीगतर्फे आम्ही सर्वांचे आभार मानले. विशे- प्रतः शे० दीपचंद जव्हेरी यानी आम्हाला फारच मदत केली. ते येथे जवाहि- राचा व्यापार अनेक वर्षे करीत असून त्यानी आपले सगळे घर आमच्या दिमतीला मोकळे करून दिले होते. ( १३२) बेनस्पूर यांचे टिळकाना पत्र लंडन ३ नव्हेंबर १९१९ हिंदुस्थानचे इतके राजकीय पुढारी येथे आल्यामुळे त्यांना भेटून त्यांच्या तोंडून हिंदुस्थानातील लोकमतासंबंधाने अस्सल माहिती मिळविता आली या- बद्दल मला फारच आनंद होतो. तुमच्या सारख्या अनुभविक राजकारणी पुरु- घाला मी काय सांगणार ? पण आमचा निरोप हिंदुस्थानाला असा कळवा की आज प्रतिकूल चिन्हे दिसत असली तरी पुढे आशा बाळगण्यास जागा आहे. तिकडील अन्यायाची अधिकाधिक माहिती इकडील लोकाना होत असल्यामुळे तुमचे हित साधण्याकडे त्यांचे पाऊल अधिक पुढे पडेल. तुमचा स्वार्थत्याग