पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ६५ ( १२८ ) अहवाल लंडन १६ आक्टोबर १९१९ आगाखान सर शंकरन नायर यांच्या साक्षी झाल्या. एकंदरीने काँग्रेस- तर्फेचेच लोक सर्वात अधिक आले आहेत म्हणून काँग्रेसतर्फे अधिक साक्षी घ्या असे पटेल यानी लिहिले. पण कमिटीने पूर्वीची पक्षपात बुद्धि कायम ठेविली. आगाखान यांची थोडी प्रगति झालेली दिसते. पूर्वी त्यानी गोखले यांचे राजकीय मृत्युपत्र प्रसिद्ध करून त्यातील सुधारणानी काम भागेल असे म्हटले होते. पण आता आपल्या साक्षीत त्यानी वरिष्ठ कारभारात अधिकारविभागणीचा हक्क सांगितला आहे. ते आणखीहि असे म्हणाले की होमरूलची भावना फार खोल गेलेली आहे. त्याना कोणी विचारले 'हे कशावरून?' तेव्हा ते म्हणाले 'मोठमोठे सरकारी अधिकारी दौऱ्यावर जातात नेमस्त पुढारी जातात आणि होमरूलरद्दि जातात. पण कोणाचे सत्कार व कोणाचे समारंभ कसे होतात हे लक्षात आणा म्हणजे समजेल,' ( १२९ ) टिळक यांचे गोखले यास पत्र लंडन १६ आक्टोबर १९१९ नवीन वर्षात मला ४३०० पौंड मुंबईहून आले. त्याचा हिशेब शेव- टल्या हिशोबात देऊ. हल्ली तक्ता पाठविला तो एका वर्षापुरता आहे. पंजाब अपील्स फंडाला दोन हजार रुपये मी येथे देतो. (१३० ) अहवाल लंडन २३ ऑक्टोबर १९१९ ठरल्याप्रमाणे हसन इमाम व पाल दौन्यावर गेले. केळकर वेलकर रंगा- स्वामी अयंगार हे बर्मिंगहॅम ब्रिस्टल टॉटन वेस्टन वगैरे गावाकडे गेले. हॉर्निमन व अयंगार हे कार्डिफकडे जाणार. दौरा संपल्याबरोबर टिळक केळकर नामजोशी वेलकर वासुदेवराव जोशी हे ३० तारखेला ' इजिप्त ' नामक बोटीने निघतील. पार्लमेंट २२ तारखेला उघ- डेल. इंडिया बिलाची पाळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात येईल. (१३१ ) अहवाल लंडन २९ ऑक्टोबर १९१९ आज पाठवीत आहे हाच येथील शेवटचा रिपोर्ट. आम्ही ता. ३० ऑक्टो- बरलाच येथून निघावयाचे. पण निदान ३ नोव्हेंबर पर्यंत निघणे होत नाही. थंडी पडू लागली आहे. तेव्हा जितके लवकर निघता येईल तितके बरेच. बिलासंबंधाने काही काम अजून शिल्लक राहिले आहे. पण खापर्डे व पटेल हे मागे रहात आहेत ते अवश्य त्या गोष्टी करतील.