पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ . लो० टिळकांचे चरित्र भाग ५ (१२५) टिळकांचे धोंडोपंताना पव लंडन २५ सप्टेंबर १९१९ मराठी टाइपांच्या अक्षरांची फार जरूरी आहे. ताबडतोब पाठवा. लिनो टाइप अगर मोनोटाइप या संबंधी त्यावाचून मला काही एक करिता येत नाही. काँग्रेसला अध्यक्ष होण्याबद्दल मला विचारतात पण पंजाबमधील मनाई हुकमाची अडचण आहे. पण पटेल म्हणतात की तो मनाई हुकूम रद्द करून घेता येईल. तसे झाल्यास तिकडे येण्याचा विचार करिता येईल. पण नक्की नाही. शके १८४१ चे पंचांग प्रसिद्ध करण्यात नुकसान आले की काय ? व असल्यास ते किती ते कळवावे. १८४२ चे पंचांग त्याचप्रमाणे प्रसिद्ध करावे. पं. रघुनाथ शास्त्री यांचे पत्र आले होते त्यास उत्तर पाठविले आहे. ( १२६ ) अहवाल लंडन २ आक्टोबर १९१९ या आठवड्यात येथील प्रचंड संपाशिवाय दुसरी गोष्ट नाही. त्याचे वर्णन केळकर यानी केसरीकडे धाडलेल्या पत्रात सविस्तर केले आहे. सिलेक्ट कमिटीची सभा ता. ७ आक्टोबरपर्यंत ढकलली गेली. पटेल पाल नायडू यांचे व्याख्यान न्यूकॅसल येथे झाले. आणि ग्लासगो येथे २६ तारखेला होणार होते पण संपा- मुळे पुढील कार्यक्रम थांबवावा लागला. ( १२७ ) अहवाल लंडन ८ आक्टोबर १९१९ या आठवड्यात टपालाची घालमेल झाली. कदाचित् एक आठवडा आमचे पत्र तुम्हाला उशीरा मिळेल. टिळक इतराबरोबर व्याख्यानाना बाहेर गेले नाहीत हे एका अर्थी बरे झाले. कारण काहीना संपामुळे ग्लासगोहून आय- डात बेलफास्टला व तेथून समुद्रमार्गे लिव्हरपूलला यावे लागले. ब्रिटन अॅन्ड इंडिया सोसायटीच्या विद्यमाने बेशंटवाईनी एक सभा भरविली. स्वतः त्या अध्यक्ष होत्या. शास्त्री वाडीया बेजवुड व केळकर यांची भाषणे झाली. प्रत्यक्ष ठराव पुढे कोणता यावा याबद्दल मतभेद होता. पण अखेर मूळचा ठराव टिळ- कांच्या सुचनेवरून बदलून सर्वाना संमत असा ठराव करण्यात आला. या सभेच्या उत्तरभागात सामाजिक विषयावर व्याख्याने झाली. संप मोडला. सिलेक्ट कमिटीपुढे होल्डरनेस व ओडायर यांच्या साक्षी झाल्या. बेझंटवाईनी ' 'युनाइ- टेड इंडिया' नांवाचे आपले एक वर्तमानपत्र काढले. नेमस्तांचे वेगळे पत्र निघाले नाही. पण बाईनी त्यांच्या लेखाना आपल्या पत्रात जागा दिली आहे. पहिल्या लेखात बाईनी काँग्रेसवर टीका केली. पण टिळकांच्याबद्दल फार चांगले लिहिले. काँग्रेस शिष्टमंडळात फूट आहे असे बाईनी लिहिले. केळकर यानी इंडिया पत्रात त्याला उत्तर दिले आहे ते वाचा व मराठ्यात छापा.