पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ६३ या भागाकडे खापर्डे पाल बाबू चमणलाल मिश्र बोदलाय व प्रधान असे गेले. दुसरा गट दिवाणसाहेब पटेल सरोजिनी नायडू यांचा. यानी बोर्नमथ व सौॲम्टन इकडे व्याख्याने दिली. इकडे श्रोतृवर्ग थोडा पण सुशिक्षित होता. सरोजिनीबाईचे वक्तृत्व व खापड्यांचा विनोद चांगलाच उपयोगी पडला. खापर्डे याना इंडियन मार्केट्रेन अशी पदवी मिळाली. तिसऱ्या भागात टिळक है गेले आहेत. बरोबर डॉ. वेलकर आहेत. अमेरिकेहून पत्र आले. त्यात लिहिले आहे की इंडियन होमरूल लीगच्या अमेरिकन शाखेने आपला रीतसर वकील देऊन अमेरिकन काँग्रेसच्या परराष्ट्रीय कमिटी पुढे हिंदुस्थानचा स्वयंनिर्णयाचा हक्क मांडला. मॅलोन हे आमचे वकील होते. टिळकानी शांतता परिषदेकडे जी कैफियत पाठविली त्याच धर्तीवर लजपतराय यानी कैफियत तयार केली. तात्पर्य होमरूल लीगची कैफियत अमेरिकेतील सरकारी कागदपत्रात तरी दाखल झाली भाग्य. बेझंटवाई व त्यांची मंडळी उत्तर भागात व्याख्याने देत आहेत. ( १२३ ) टिळकांचे धोंडोपंताना पत्र लंडन १८ सप्टेंबर १९१९ केसरीकरिता रोटरी मशिनच्या शोधात आहे. या मशिनने दर ताशी ६००० प्रति दोन्ही बाजूने छापून घड्या घालून बाहेर पडतील. आणि केसरीची ३२ हजार प्रत काढण्याचे काम सहा तासात हातावेगळे होईल. छापण्याकरिता कागदाच्या गुंडाळलेल्या गाठी आणि स्टिरीओ लेटी लागतील व हे काम आपल्याकडेहि होऊ शकेल. हे मशीन घेण्यास सुमारे १००० पौंड ( १० हजार रुपये.) लागतील. नवीन कोरे मशीन घ्यावयाचे तर पुष्कळच जास्त खर्च पडेल. कारण किंमती फार वाढल्या आहेत. कसेहि असले तरी पुढे १०-१५ वर्षेपर्यंत केसरी छापखान्याची उत्तम व्यवस्था करून टाकतो. त्याबद्दल काही काळजी करू नकोस. ( १२४ ) अहवाल लंडन २५ सप्टेंबर १९१९ चालू आठवड्यातील व्याख्यानांच्या कार्यक्रमासंबंधाने सर्व माहिती इंडिया पत्रात दिली आहे. ब्रि. कमिटीकरिता सुचविलेली घटना तिने मान्य केली आहे. इंडिया पत्रातील एका विशेष लेखावरून राष्ट्रसंघापुढे हिंदुस्थानची कैफियत मांडण्याच्या कामी टिळकानी प्रथम स्वतंत्रपणे व नंतर काँग्रेसतर्फे काय खटपट केली याचा वृत्तांत दिला आहे. प्रे० विल्सन यानी राष्ट्रसंघ व हिंदुस्थान आय- " इति यासारखीहि राष्ट्रे यांचा संबंध काय आहे व असावा याविषयी जाहीर विधाने केली. पण असली भाषणे किंचित नखाने खरवडली तर आत अप्रामाणिकपणा दिसून येतो. तरी पडत्या फळाप्रमाणे प्रगट उद्गारांचा फायदा हिंदुस्थानाने का घेऊ नये ? या मुद्याकडे राष्ट्रीय सभेने विशेष लक्ष दिले पाहिजे.