पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२. लो० टिळकांचे चरित्र भाग ५ टिळकानी लहानसे भाषण केले. नंतर त्या दिवशी टिळक एडिंबरोस निघून गेले. तेथे त्याना रात्री मेल हिल टेरेस येथे स्थानिक हिंदी लोकाकडून मेजवानी व्हावयाची होती. X X X X परवाच्या सभेत एक गोष्ट घडून आली ती ही की, लंडनमधील काही हिंदी लोकांच्या मते निषेधाची मजल शब्दापलीकडे जाऊन तिला सरकारावर निदान नवीन सुधारणावर बहिष्कार घालण्याच्या कृतीचे स्वरूप यावे. किंबहुना मि. सकलादवाला मि. सत्यमूर्ति मि. चमनलाल यानी अशा अर्थाची उपसूचना पुढे आणून तीवर वादविवादहि करविला. पण लो. टिळक व लंडनमधील कायमचे रहिवासी बॅरिस्टर डुबे व पारिख यानी या उपसूचनेविरुद्ध भाषणे केली व अखेर मोठ्या बहुमताने ही उपसूचना नामंजूर झाली. लोकांचे नागरिकत्वाचे मूलभूत हक्क नष्ट झाले तर सुधारणा आम्हाला कितपत अंगी लागणार ? याच दृष्टीने राष्ट्रीय सभेच्या डेप्युटेशनाच्या लेखी कैफियतीत लोकाना व्यक्तिस्वातंत्र्याची सनद आधी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि उपसूचनेच्या स्वरूपाचा ठराव लंडनमध्ये न होता तो हिंदुस्थानात हिंदी लोकसमूहाच्या संमतीनेच झाला पाहिजे. लंडनमध्ये भाषणे किंवा ठराव करताना हिंदुस्थानातील लोकस्थितीचा विसर पडून उपयोगी नाही हा युक्तिवाद सभेतील बहुमतास पटला व सत्यमूर्तीची उपसूचना नामंजूर झाली. वास्तविक अशा प्रकारची उप- सूचना आपल्यापैकीच एकाकडून आयत्या वेळी पुढे येणेच योग्य नव्हते. पण सत्यमूर्ति यांचा समावेश कॉंग्रेसच्या खास डेप्युटेशनमध्ये पंडित मदन मोहन यानी न केल्यामुळे ते केवळ व्यक्तिशः मनास वाटेल त्याप्रमाणे भाषणे करीत असतात. 'हिंदी' पत्रास सत्यमूर्ति यांची पत्रे एकतर्फी किंबहुना व्यक्तिविषयक मजकूराचीच अशी जातात याचे आश्चर्य पुष्कळास वाटते असे मला समजले आहे. पण या सर्वांच्या मुळाशी काय आहे याचा उल्लेख केव्हा तरी मला करा- वयाचा होता तो नाइलाजाने या प्रसंगी केला आहे. सत्यमूर्ति हे डेप्युटेशनमध्ये नाहीत हे लक्षात ठेवूनच त्यांची भाषणे व हालचाठी यांचा वृत्तात वाचला पाहिजे. ( १२२ ) अहवाल लंडन १८ सप्टेंबर १९१९ व्याख्यानांचाच झाला. कारण व्याख्यात्यांचा एक गट वेल्स गेल्या दोन आठवड्यात मुख्य कार्यक्रम पार्लमेंटसंबंधी सर्व लोक बाहेर गावी गेले आहेत. प्रांतात गेला. तिकडे ७/८ व्याख्याने झाली. मजूरसंघांचे केंद्र असतील अशी गावे पसंत केली होती. दोन व्याख्यानाना एक हजार श्रोतृसमुदाय असावा. सुधारणाबरोबर हिंदी मजूरांचा प्रश्नहि त्यात होता. व्याख्यात्याना आडवे तिडवे व अडाणी प्रश्न विचारीत. कारण त्याना हिंदुस्थानातील काहीच माहिती नसते.