पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ( १२१ ) बातमीपत्र लंडन ११ सप्टेंबर १९१९ " ६ १ या आठवड्यात सिलेक्ट कमिटी बंद असली तरी डेप्युटेशनांचे खासगी काम बरेच झाले. लो. टिळक गेल्या शुक्रवारी ग्लासगोकडे गेले ते दोन दिवसानी परत येतील. ग्लासगो येथे जाताच त्यांचे कामास सुरुवात झाली. शनिवारी ' युनियन ऑफ डेमोक्रॅटिक कंट्रोल' या संस्थेच्या विद्यमाने सभा भरली होती. मि. विशार्ट यांच्या अध्यक्षतेखाली मि. बक्स्टन व रामसे मॅकडोनाल्ड यानी भाषणे केली. सभेचे पाहुणे म्हणून अध्यक्षानी टिळकांचे स्वागत केले व हिंदी लोकांच्या कार्यास या सभेचीच काय पण या संघाची निरंतर सहानुभूति मिळेल असे आश्वासन दिले. सोमवार ता. ८ रोजी अॅव्हेन्यू नामक नाटकगृहात इंडि- पेंडंट लेबर पार्टीच्या विद्यमाने 'हिंदी राजकीय सुधारणा या विषयावर टिळ- कांचे स्वतंत्र व्याख्यान झाले. या सभेस शेंकडो लोक हजर होते. त्याच दिवशी सायंकाळी सेंट अँड्र्यूज नामक शहरच्या मुख्य सभागृहात ट्रेड्स युनियन काँग्रे- सची अत्यंत महत्वाची परिषद भरली होती. या परिषदेपुढे परिषदेबाहेरच्या वक्तयाची भाषणे झाली. त्यातील मुख्य भाषण टिळकाकडे होते. सभागृहातील पांचसहा हजार श्रोतृवृंदानी उत्थापनपूर्वक टिळकांचे जंगी स्वागत केले. टिळकानी थोडक्यात डेप्युटेशनचे हेतु परिप्रदेस सांगून तुमची सर्वोची सहानुभूति असेल तरच हे आमचे अवघड काम होईल अशी कळकळीची विनंति केली. नंतर परिषदेच्या खास कार्यक्रमास सुरुवात झाली. तथापि परिषदेपुढील विषयावर रामसे मॅकडोनाल्ड यांचे जे मुख्य भाषण झाले त्यात टिळकानी केलेल्या विनं- तीस अनुलक्षून व लेबर पक्षास उद्देशून त्यानी मुद्दाम भाषण केले. ते म्हणाले की 'हिंदुस्थानात सरकारविरुद्ध लोकपक्षाची जी गाऱ्हाणी आहेत त्यांना जी दु:खे भोगावी लागत आहेत त्यांची प्रत्यक्ष देहमयमूर्ति म्हणजेच टिळक असे समजा व आज तेच स्वतः तुमच्यापुढे उभे आहेत व हिंदी लोकाना राजकीय स्वातंत्र्य मिळण्याविषयी जो झगडा सुरू आहे त्यात मदत करा अशी विनंति करीत आहेत तरी तुमच्या वतीने मी त्याना आश्वासन देतो की ही मदत स्वतंत्र मजूर पक्षाकडून त्याना अवश्य मिळेल. सोशिअॅलिस्ट उर्फ समाजसत्तावादी लोकांचा पक्ष हा अमुक एका देशाचाच आहे असे नाही तर जगातील कोणत्याहि भागात न्याय स्वातंत्र्य लोकमत यांचाच अंमल चालू व्हावा अशाविषयी त्याचे प्रयत्न अव्याहत चालू असतात. ' असो ही सभा झाल्यावर त्याच दिवशी रात्री " ग्लासगो इंडियन यूनिअन' नामक संस्थेच्या विद्यमाने इंग्रज स्कॉच व हिंदी अशा सर्व लोकाना मिळून अॅट-होम-पार्टी देण्यात आली होती. या ठिकाणी मजूर पक्षाशिवाय इतर पंथाचेहि लोक होते. त्यांना उद्देशून टिळकानी सुमारे एक तासभर भाषण केले. रा. नामजोशी वगैरे इतर हिंदी गृहस्थांचीहि भाषणे झाली. ता. १० रोजी 'वुइमेन्स वर्कर्स' नामक स्त्री संघाची सभा होती तेथेहि