पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० लो० टिळकांचे चरित्र भाग ५ मांडवकर यास तसे १०-१२ नमुने तयार करून ताबडतोब पाठवून देण्यास सांगावे. मांडवकर याजजवळ त्यांचे पंच व मेट्रिसा तयार आहेतच. ताबडतोब पाठवा त्यांची फार जरूरी आहे. (११९) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन ४ सप्टेंबर १९१९ केसरी छापण्यासंबंधाने तुमचे सविस्तर पत्र मिळाले. त्याबद्दल सबै नीट व्यवस्था करितो. मी पाडलेल्या पायका टाइपाचा नमुना पाठवून द्या. तसेच प्रत्येक अक्षराचे एक दोन टाईप पाठवा. म्हणजे ते येथे दाखवण्यास ठीक पडेल. सहदेवाचे वळण जरा वाकडे आहे. करिता राणूचे टाईप पाठवल्यास बरे. टाइ- पांचे पार्सल लौकर पाठवण्याची तजवीज करावी. (१२० ) अहवाल लंडन ४ सप्टेंबर १९१९ नेमस्त शिष्टमंडळाने आपली कचेरी आता बंद केली असून त्यांचे काही लोक लवकरच तिकडे परत जातील असे म्हणतात. कॉंग्रेस शिष्टमंडळाच्या व्याख्यानांचा कार्यक्रम ठरला. त्याची हकीगत क्रमाने पाठवू. सुमारे एक महि- न्याचा कार्यक्रम आखला आहे. सोयीप्रमाणे निरनिराळ्या लोकांचे गट करून जाऊ. एसेक्स हॉलमध्ये सय्यद हसन इमाम यांचे पंजाबातील अत्याचारावर फार चांगले भाषण झाले. नंतर हॉर्निमन पाल सकलातवाला लॅन्सवरी केनवर्दी वगैरे लोकांचीहि भाषणे झाली. चमनलाल यानी उपसूचना आणिली की पंजाब प्रक- रण आपल्या मनासारखे निकालात निघेपर्यंत सुधारणावर बहिष्कार घालावा. सकलातवाला आणि सत्यमूर्ती यानी तिला दुजोरा दिला. पण टिळक व बॅ. डुबे व पारिख यानी त्याविरुद्ध भाषणे केली. उपसूचना नापास झाली. फारच थोड्या लोकानी तिच्या बाजूने मते दिली. सरोजिनी नायडू आणि इंडियन प्रेस असो- सिएशन यानी निरनिराळ्या पाय दिल्या. या दुसऱ्या पार्टीला काही इंग्रज वर्तमानपत्रकर्ते आले होते. त्यानी भाषणात असे ध्वनित केले की हिंदुस्थानातच काय पण विलायतेतहि मतस्वातंत्र्यावर घाला पडत आहे. इकडे तो इतका उघड नसतो इतकेच. गुरुवारी माँटेग्यू साहेबानी निरनिराळ्या कमिट्यामार्फत प्रतिनिधींची मुलाखत घेतली. विषय पंजाबातील अत्याचारांचा होता. याविषयी सविस्तर हकीगत इंडिया पत्रात पहा. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत ओरिएन्टल काँग्रेस भरली होती. टिळक प्रेक्षक म्हणून हजर होते. अध्यक्ष सर चार्लस लायल यानी हिंदुस्थानातील विद्वत्तेच्या प्रगतीविषयी प्रशंसापर उद्वार काढले.