पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ( ११६ ) अहवाल लंडन २१ आगष्ट १९१९ ५९ अँग्लोइंडियनातर्फे वेल्बी व स्टीव्हन यानी साक्ष दिली. अर्थात ते सुधा- रणाविरुद्ध बोलले. पण माँटेग्यू साहेबानी त्यांची चांगली हजेरी घेतली. टाईम्स - पत्राचे सर स्टॅन्ले रीड यानी वरिष्ठ कारभारात काही खाती सोपीव करावी असे सांगितले, भास्करराव जाधव यानी साक्ष देताना काँग्रेसच्या योजनेला पाठिंबा दिला. ब्रह्मी साक्षीदारानी हिंदुस्थानाबरोबरीने ब्रह्मदेशाला अधिकार मागितले. पार्लमेंट २२ आक्टोबरला भरणार म्हणून सिलेक्ट कमिटीला मध्ये काही दिवस सुट्टी मिळेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा आधी बिल पुढे येईल. प्रधानमंडळातील गडबड थांबलेली दिसते. यामुळे नोव्हेंबरातच बिल निकालात निघेल असे वाटते. पंजाब चौकशीकरिता कमिशन नेमणार पण तूर्त सरसकट माफी देत नाहीत असे बोलतात. टिळकानी माँटेग्यू साहेबांची फिरून गाठ घेतली. डॉ. वेलकर आले. आमच्याकडेच आहेत. विपिनपाल व डॉ. साये देहि तिकडून निघाल्याचे समजले. ( ११७ ) अहवाल लंडन २८ आगस्ट १९१९ सिलेक्ट कमिटीने या आठवड्यात काम केले आणि दोन आक्टोबरपर्यंत सुट्टी घेतली आहे. कित्येक युरोपियन साक्षीदारांच्या साक्षी या आठवड्यात झाल्या. हिंदी ख्रिस्ती लोकाकरिता कोणी रे. भाभा व पाल यानी साक्षी दिल्या. मद्रास ब्राह्मणेतर व द्रवीडसंघ यांच्यातर्फेहि साक्षी झाल्या. सर बुइल्यम मायर आपले जुने फडणवीस यानी पाच वर्षात वरिष्ठ कारभारात अधिकार विभागणी करावी असे सांगितले. हसन इमाम, बिपिन पाल रंगास्वामी सर शंकर नायर हे आले आहेत. नॉर्दम्टन येथे सोशालिस्ट पार्टीची परिषद भरली. तेथे हाइन्डमन यानी हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळावे असा ठराव मांडला. तो फक्त एक मत विरुद्ध पडून मंजूर झाला. हा ठराव केळकरानी तुम्हाकडे तारेने पाठविलाच आहे. बेझंटबाईनी लिव्हरपूलच्या आसपास सहा व्याख्याने दिली. टिळक ५ सप्टेंबर रोजी ग्लासगो येथे जाणार. वेल्सच्या दक्षिण भागातहि काही व्याख्याने ठरली आहेत. (११८) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन २८ ऑगस्ट १९१९ मराठी मोनोटाइप करिता राणूंजी व देवधरी टाईप यांच्या वळणाची अक्षरे यंत्रावर बसवता येतील की काय हे मी पहात आहे. माझे बरोबर येताना जावजी व सहदेव यांचे नमुने मी आणले होते. पण ते पान कोठे तरी हरवले. पण