पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ इंग्रज लोक निर्दयपणाने कसे वागतात, हे काही स्पष्ट सांगितलेत तर लोक नीट ऐकून घेतील व तुमचा उपयोग होईल. ( ११४ ) अहवाल लंडन १४ आगस्ट १९१९ नेमस्तातर्फे दोनच साक्षीदार मान्य केले. पण त्या सर्व मंडळीना कमिटी- पुढे बसलो असे म्हणता यावे म्हणून त्यांचे दोन भाग करून एकेका भागातील मंडळीने कमिटीपुढे हजर व्हावे पण त्यातील फक्त एकाने बोलावे असे ठरले आहे. समर्थ के. सी. रॉय पृथ्वीशचंद्र चिंतामणी असे मिळून प्रथम साक्षीला गेले. ब्राह्मणेतरातर्फे व्यंकट रेड्डी व रामरायनिंगार यानी साक्षी दिल्या. शिखातर्फेहि एकाची साक्ष झाली. इकडे साक्षी घेण्याचे काम चालू आहे पण तिकडे रिपोर्ट लिहिण्याचे काम सुरू आहे याचा अर्थ साक्षीना फारसे महत्त्व देणार नाहीत. जिना व सय्यद हुसेन यांच्या साक्षी काल झाल्या. पुढारलेल्या प्रांताना एकदम स्वातंत्र्य द्यावे असे मत त्यानी जोराने प्रतिपादिले. शास्त्री व रामचंद्रराव यांची एकत्र साक्ष झाली. बेझंटबाई केळकर व पटेल हे नियमाने कमिटीला हजर रहा- तात. दिवाण माधवराव यानीहि माँटेग्यू साहेबांची गाठ घेतली. प्रसंग सापडेल तेथे सत्यमूर्ती हे तारे तोडू लागले आहेत ! पंजाब प्रकरणात काँग्रेसचे डेप्युटेशन जात नाही. पण पटेल यानी खाजगी मुलाखतीत कॉंग्रेसचे म्हणणे माँटेग्यूसाहे- वाना सांगितले, हाइन्डमन यानी जस्टिस पत्रात एक फार कडक लेख लिहिला आहे. पण हिंदी पत्राने तो छापला तर त्याच्यावर हटकून खटला होईल. सक- लातवाला यांची भाषणे मधून मधून होतात. ते प्रत्यक्ष मजूरवर्गासंबंधाने विशेष बोलतात. (११५) टिळकांचे धोंडोपंतास पल लंडन १४ ऑगस्ट १९१९ अण्णासाहेब देशपांडे यास शिवाजी स्मारकफंडाचे बाबतीत लिहिले आहे. पंजाबातील हद्दपाय व जप्तीचे सत्र कमी झाले हे वाचून थोडे समाधान वाटले. पण एवढ्याने काय होणार? आम्हाला सार्वत्रिक माफी मिळावयास हवी. माँटेग्यू साहेबाना याबद्दल कळविले आहे. ते काय करितात पाहावे. गांधी यांच्या एकंदर तिकडील चळवळीबद्दल समजले. पण त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी काय आहेत हे कळल्याखेरीज त्यावर मला टीका करिता येत नाही. येथे उन्हाळा सुरू झाला. उष्णतामान ८२° ते ८५° असते. पण हवा दमट असल्याकारणाने हिंडून फिरून आल्यास मुंबई सारखाच अंगाला घाम येतो. उष्णतेचे मान कमालीचे चढले आहे असे येथील लोक म्हणतात !