पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ निवडक कागदपत्र ५७ आपल्या ठिकाणी केला असता. पण तसे करण्याची कमिटीची छाती झाली नाही. बरे भलेपणा घेण्याकरिता किंवा सरळ सार्वजनिक बुद्धीने जर कमिटीने त्याना साक्षीला बोलावले तर रीतीप्रमाणे इतर साक्षीदारासारखे चार प्रश्न विचारावयास काय हरकत होती ? तसे केल्याने कमिटीस बट्टा लागण्याचा संभव नव्हता. पण साक्षीस तर बोलावले त्याना आपले म्हणणे सर्व मांडू दिले पण उलटसाक्षीपुरता त्यांच्याशी अबोला धरला. यात कमिटीने कोणते तत्त्व किंवा कार्य साधले दे कमिटीसच माहीत ! पण उलट प्रश्न न विचारले तरी होमरूल लीगचे काम झाले. अशा कमिट्या व त्यापुढील साक्षी याचा मुख्य उपयोग हाच असतो की ज्याला त्याला आपले म्हणणे जाहीर रीतीने मांडता यावे. आणि टिळक पटेल व माधवराव यांच्या साक्षी वाचल्या म्हणजे इंग्रज राष्ट्राचे पुढारी मुत्सद्यातले मुरब्बी अधिकाऱ्यातले अग्रगण्य अशांच्या समोर तोंडावर लोकपक्षाचे खरे खरे विचार स्पष्ट निर्भीड भाषेत मांडण्यात आले यात सर्व कार्यभाग आला. ज्याना अधि- कायांचे स्नेह जोडण्याला किंवा आपापले खासगी कावे साधण्याला येथे यावयाचे असेल त्यांची गोष्ट अर्थात् निराळी. (११२) हाइंडमन यांचे टिळकाना पत्र हॅम्पस्टेड १२ आगस्ट १९१९ पार्लमेंट सभा भरण्याचे पूर्वी लंडनमध्ये एक टोलेजंग परिषद भरविण्याची खटपट आम्ही करीत आहो. तुम्हा डेप्युटेशनच्या लोकाना येथे येऊन भाषणे करिता येतील, काही खाजगी समाहि एक दोन आठवड्यात बोलावतो. शांतता परिषद व लीग ऑफ नेशन्स यांच्याकडे जाऊन जे प्रयत्न तुम्ही केले त्यात तुम्हास यश आले नाही. तरी आता तुम्ही उघड उघड बोलावयास सुरवात केली पाहिजे. व हिंदुस्थानात किती भयंकर स्थिति आहे हे लोकास समजावून दिले पाहिजे. नुसत्या माँटेग्यू बिलाच्या चर्चेत लोकांचे लक्ष वेधण्यासारखे काही नाही. हिंदुस्थानातील अन्याय व छळ यावरच भर दिला पाहिजे, ( ११३) हाइडमन यांचे खापर्डे याना पत्र लंडन १२ आगस्ट १९१९ सोशालिस्टांच्या परिषदेला टिळकानी येण्यापासून फारसा फायदा नाही. वेळ भरपूर नाही आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्धीहि फारशी मिळणार नाही. पण पार्लमेंट उघडण्यापूर्वी लंडनमध्ये एक भली मोठी सभा भरवून तेथे शिष्टमंडळाची भाषणे करविण्याचा आमचा विचार आहे. राष्ट्रसंघ शांतता परिषद इकडे केलेल्या प्रयत्नाना कितपत यश आले ते पाहताच, तरी आता माझा उपदेश ऐकत जा. आणि तोंडाचे कुलूप काढून मुत्सद्दीगिरी न करता अगदी मनास येईल ते स्पष्ट बोलत जा. काय ते तुमचे इंडिया बिल ? इकडे कोणाला ते कळणार आणि कोण त्याची पर्वा करतो ? हिंदुस्थानात सरकार अन्याय काय काय करते,