पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ टेशनप्रमाणे संघाचेहि सर्व सभासद म्हणजे टिळक खापर्डे व केळकर तिथेहि तयार आहेत, तिघांच्याहि साक्षी घेण्यात याव्या, व तिघांच्या नावे कमिटीचे प्रश्न पाठविण्यात यावे, असे कमिटीच्या चिटणिसास कळविण्यात आले होते. पण दर डेप्युटेशनागणिक होता होईतो एकच साक्षीदार घ्यावयाचा असे कमिटीने ठर- विले आहे. सबन एकाच गृहस्थाचे नाव द्या असे उलट लिहून आल्यावरून अर्थात् टिळक हेच संघाचे एक साक्षीदार असे चिटणिसास लिहून गेले. तेव्हा टिळकांची साक्ष घ्यावयाची की नाही हा प्रश्न कमिटीपुढे अध्यक्षानी मांडला. 'कमिटीतला वादविवाद अर्थात् गुप्त होता. पण अशाहि गुप्त खलबताचे अनुरण- नात्मक ध्वनि भिंतीतून बाहेर पडत असतात. त्यावरून असे समजते की टिळकांची साक्षच घेऊ नये असे म्हणणारे बहुमत कमिटीत होते. तथापि ती का घेऊ नये या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मात्र या बहुमतवाल्यास सुचेना ! तेव्हा नाइलाज म्हणून टिळकांची साक्ष घेण्याचे ठरून टिळकाकडे प्रश्नांची यादी पाठविण्यात आली. व त्या प्रश्नांची उत्तरे टिळकानी लिहून पाठविली त्यावरून टिळकाना काल बुधवारी सकाळी साक्षीस बोलाविले. रीतीप्रमाणे अध्यक्षानी टिळकाना प्रश्नी- त्तराखेरीज तुम्हाला आणखी काही सांगावयाचे असल्यास सांगा असे विचारल्या- वरून त्यानी सुमारे दहा मुख्य मुद्यावर सुसंगत सुव्यवस्थितपणे अवांतर किंवा अधिक उगा एकहि शब्द न बोलता राष्ट्रीय सभेची स्वराज्ययोजना कमिटीस सांगितली. प्रश्नोत्तराचे टिपण जे त्यानी प्रथम पाठविले होते त्याला धरून पण त्याची सूत्ररूपाने एकवाक्यता करून टिळकानी कमिटीपुढे आपला खुलासा मांडला व तो लोकाना फारच पसंत पडला. यानंतर मधली सुट्टी झाली व फिरून कमिटी भरल्यावर टिळकांची उलटतपासणी पहावयास सांपडेल अशी लोक उत्सुकतेने वाट पहात होते. पण कमिटीच्या पोटातले पाय या वेळी बाहेर आले.. तिने टिळकास साक्षीस बोलवावयाचे पण एकहि प्रश्न विचारावयाचा नाही असा आपणात निश्चय केलेला असल्यामुळे त्यांची साक्ष उलटतपासणी शिवायच संपली. लॉर्ड सिडनहॅमसाहेब तर आधीच उठून गेले होते ! टिळकाना उलट तपासणीत एकहि प्रश्न विचारावयाचा नाही याचा अर्थ त्यांच्यावर कमिटीची इतराजी हाच होय हे उघड आहे. व ही इतराजी का तर ती टिळकांच्या राजकीय मताकरिता. किंवा सरकारचा व त्यांचा जो अपूर्व ऋणानु- बंध आहे त्याकरिता हेहि उघड आहे. पण ही गोष्ट घेऊन चालले तरी त्याना प्रश्न न विचारण्याचा जो पोरकटपणा कमिटीने केला त्याचे मात्र पुष्कळाना हसू आले. कमिटीचा टिळकावर राग होता तर तिने टिळकाना साक्षीसच बोलवाव- याचे नव्हते. तसे करण्यास त्याना भाग पाडण्यास होमरूल लीगला साधन काय होते ? हा केवळ खुषीचा सौदा आहे. "टिळकाना नाकारता त्याअर्थी आम्ही आमच्या वतीने दुसरा कोणीच साक्षीदार पाठवीत नाही " असे फार तर लीगने उत्तर दिले असते. व जगाने झाली ही गोष्ट बरी अगर वाईट याचा न्याय