पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ( १०९ ) बातमीपत्र लंडन ३१ जुलै १९१९ ५५ हिंदी स्वराज्यसंघातर्फे साक्ष द्यावयाची ती टिळक देणार असून कमिटीच्या प्रश्नांची उत्तरे त्यानी कमिटीकडे रवाना केली आहेत. त्यांची साक्ष बहुधा येत्या आठवड्यात होईल. परवा सायंकाळी टिळकाना माँटेग्यूसाहेबानी इंडियाऑफिस- मध्ये भेटण्यास बोलाविले होते. उभयतांचे संभाषण अर्धा तास झाले. त्यात पंजा- बातील स्थिति सुधारणांचे बिल राष्ट्रीय सभेच्या मागण्या वगैरे विषय आले होते. अर्थात् कोण काय बोलले याची नक्की माहिती नाही. तथापि पंजाबसंबंधाने पुढील आठवड्यापर्यंत काही तरी निश्चित सरकारी धोरण ठरून जाहीर होईल असा अदमास आहे. आणि पुढील आठवडयात माँटेग्यूसाहेबाशी टिळकांची फिरून एक वेळ गाठ पडेल असेहि वाटते. चालू आठवड्यात आम्ही जुने घर सोडून दुसऱ्या एका बिन्हाडी राहावयास जात आहो. आमचा नवा पत्ता " नं. ६० टालवटरोड बेजवॉटर डब्ल्यू २ 35 असा आहे. ( ११० ) अहचाल लंडन ७ ऑगस्ट १९१९ आम्ही टॉलबट रोडमध्ये दीपचंद जव्हेरी यांचे घरी राहावयास गेलो. डॉ. वेलकर व प्रधान हे २६ ऑगष्टला निघणार म्हणतात. पण इकडे तर कमिटीचे काम तोंपर्यंत संपूनहि जाईल. मग ते एरवीच येत असतील तर कोणास ठाऊक ? पटेल दिवाणसाहेब व टिळक यांच्या साक्षी वेगवेगळ्या वेळी झाल्या. दिवाण- साहेबानी प्रांतिक स्वातंत्र्याची मागणी करून देशी संस्थानातील कारभाराचा दाखला दिला. उलट तपासणीत दिवाणसाहेबापेक्षा पटेल अधिक टिकले. टिळ- कांची उलट तपासणी कमिटीने केली नाही. मिसेस नायडू यांचीहि उलट तपा- सणी केली नाही. पंजाब प्रकरणाची चौकशी करण्याकरिता कमिटी नेमण्याचा विचार स्टेट सेक्रेटरी करीत आहेत. कदाचित् पंजाबात शिक्षा झालेल्या लोकाना सरसकट माफी देतील असे म्हणतात, लेबरपार्टीने पार्लमेंटरी मेजवानी दिली. त्यांच्या आमच्या काही काही लोकानी भाषणे केली. त्रि. काँ. कमिटीच्या घटने- संबंधाने स्वतः डॉ. क्लार्क यानीच आता अनुकूल लेख इंडिया पत्रात लिहिला आहे तो पाहा. पर्स फंडाच्या वर्गण्या आता थांबवा. अमृतसरच्या रा. सभेचे अध्यक्ष कोणी व्हावे याच्याविषयी कारस्थाने सुरू आहेत. म्हणून सूचना दिली आहे. लक्षात ठेवा. स्वतः टिळकाबद्दल प्रभच नाही. कारण ते कदाचित राष्ट्रीय सभेपर्यंत परतहि जाऊ शकणार नाहीत. (१११) बातमीपत्र ह्यानंतर लो. टिळक यांची साक्ष झाली. लंडन ७ आगष्ट १९१९ यासंबंधाने थोडी प्रास्ताविक हकीकत सांगणे जरूर आहे. स्वराज्यसंघातर्फे साक्षी देण्यास राष्ट्रीय सभेच्या डेप्यु-