पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ आजारी होते याचा आम्ही कसून शोध चालविला आहे व शोध लागल्यास तुम्हास कळवू ! 'ब्रॉडस्टेअर्स' या इंग्रजी शब्दाचा अर्थ रुंद जिना असा होतो. जिना रुंद असलेला तर अधिकच चांगला. त्यावरून पडण्याचे काय कारण ? या कार्यकारण विसंगतीच्या खुलाशाचा आमचा शोध चालू आहे. (१०६) बर्नार्ड हौटन यांचे टिळकाना पत्र लंडन २८ जुलै १९१९ मी जॉइंट कमिटीपुढे साक्ष देण्याला तयार आहे. त्यात मला त्रास कसला व श्रम तरी कसले ? उलट तो मला सन्मानच वाटेल. हिंदुस्थानला जरूर ते राजकीय स्वातंत्र्य मिळताच प्रगतीच्या मार्गाने ते ताबडतोब पुढे जाईल आणि चालू सुधारणावरहि आपली छाप पाडल्याशिवाय राहणार नाही अशी माझी समजूत आहे. तूर्त दिवस वाईट आहेत खरे. हल्लीचे अधिकारी वाईट आहेत. तथापि इंडिया कौंसिलातील लोक त्यातल्यात्यात बरे आहेत म्हणून काही आशा वाटते. (१०७) अहवाल लंडन ३१ जुलै १९१९ सुरेंद्र बाबू रामस्वामी अय्यर बेझंटबाई यांच्या साक्षी झाल्या. काँग्रे- सच्या मागणीशी आमचा मतभेद असलाच तर तो फार थोडा आहे असे तिघानीहि सांगितले. स्पूर यांच्या प्रश्नावरून सुरेंद्र बाबू म्हणाले की कलकत्ता काँग्रेसने सुचविल्याप्रमाणे स्वराज्यदानाला वेळेची काही तरी मर्यादा असावी. ब्रिटिश कमिटीची घटना तुम्ही आता प्रसिद्ध करण्यास हरकत नाही. बेझंट- बाईंची साक्ष होऊन त्या मोकळ्या झाल्यामुळे त्यानी आपली व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्या आपापल्यातील वाद पुढे आणीत नाहीत आणि भाषणेहि फार परिणामकारक होतात. कॅक्स्टन हॉलमध्ये २९ जुलै रोजी पार्टी झाली. निर- निराळ्या वक्त्यानी भाषणे केली. त्याच दिवशी संध्याकाळी लेबर पार्टीच्या पार्लमेंटरी सभासदांची सभा झाली. टिळक खापर्डे पटेल यानी भाषणे केली. ertsमन यानी अध्यक्ष या नात्याने भाषण केले. दुसरे दिवशी अशीच एक सभा . वेजवुड यांच्या निमंत्रणावरून भरली होती. (१०८) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन ३१ जुलै १९१९ मेंदूमधील रक्तस्रावाच्या विकाराने मी आजारी आहे अशी खोटी बातमी तुम्हाला कोणी कळविली कोणास ठाऊक ! मी कशानेहि आजारी नाही, फक्त डावा पाय थोडा दुखत आहे. बाकी माझी प्रकृति हिंदुस्थानातल्यापेक्षाहि चांगली आहे. गोखले यास तार पाठविली आहे. यापुढे पर्सफंड जमा करण्याचे काम एकदम तहकूब करावे. विनाकारण आपला भार लोकावर का टाकावा १