पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ निवडक कागदपत्र ५३ सध्याची आपली आर्थिक परिस्थिति फार धोक्याची झाली आहे म्हणून सावधगिरीने वागा. ( १०४ ) फिलिप स्नोडन यांचे केळकराना पत्र लंडन २४ जुलै १९१९ कमिटीपुढे रॅम्से मॅक्डोनल्ड यानी साक्ष द्यावी म्हणून तुम्ही लिहिले या सूचनेबद्दल आभारी आहो. पण मॅक्डोनल्ड यांचे म्हणणे असे की मि. स्पूर यानी कमिटीच्या अध्यक्षाशी प्रथम बोलून नंतर त्याना विनंति करावी. स्पूर व अध्यक्ष यांचे बोलणे झाल्यावर आमच्या कौंसिलकडून मॅक्डोनाल्ड याना विनंति करू. या आठवड्यात मॅक्डोनल्ड हे बाहेरगावी जाणार आहेत हीहि एक अड- चण आहेच. (१०५ ) बातमीपत्र लंडन २४ जुलै १९१९ या आठवड्यापासून 'इंडिया' पत्र काँग्रेसच्या पक्षाचे झाले. आता त्याच्याविषयी पैशाची कायमची तरतूद व संपादकीय व्यवस्था लवकरच करावी लागेल. 'इंडिया' पत्राचा संपादक हिंदी असावा ही कल्पना जुनी बऱ्याच दिवसांची आहे. यापुढे तरी ती कल्पना फलद्रूप होते का पहावे. येथील ब्रिटिश काँग्रेस- कमिटी नियमबद्ध नाही. हे मी मागील पत्रात लिहिलेच होते. ही गोष्ट खुद्द ब्रिटिश कमिटीच्या लक्षात येऊन या आठवड्यात तिची घटना कशी असावी याविषयी डेप्युटेशनची पोटकमिटी व ब्रि. काँ. कमिटीची पोटकमिटी यानी एकत्र बसून चर्चा केली असून लवकरच हा विषय कमिटीपुढे मांडण्यात येईल व तिच्या संमतीने घटना कायम झाल्यास त्याप्रमाणे येत्या डिसेंबरात राष्ट्रीय सभेपुढे ती घटना मंजूर करण्यास ठेवण्यात येईल. 'इंडिया' पत्रासंबंधाने मि. पोलाक यांच्या खटपटीने पुनः उलटे पालटे होते की काय असे वाटत होते. पण झाले हे अयोग्य झाले येवढे पत्राच्या रूपाने डायरेक्टरापुढे मांडून ते स्वस्थ बसले असे वाटते. हिंदुस्थानात 'इंग्लिशमन' पत्राने टिळकांच्या प्रकृतीसंबंधाने निराधार विपरीत बातमी पसरून फारच गोंधळ उडवून दिला असे दिसते. वास्तविक टिळक हिंडते फिरते असता व सभाव जात असता येथील कोणा बातमीदाराने झाले तरी असली बातमी तिकडे कशी पाठवावी हे कळत नाही. टिळकांबरोबर डॉ. नायर यांच्या आजाराची जी बातमी त्याच बातमीदाराने पाठविली ती मात्र खरी होती. कारण डॉ. नायर काळजाच्या विकाराने बरेच आजारी होते व या आठवड्यात ते वारलेह. त्यांचा परदेशात एकाएकी असा अंत झाला हे शोच- नीय होय. असो. पण टिळकांच्या बातमीसंबंधाने यत्किंचितहि आधार नव्हता. अर्थात् ता. २४ जूनच्या केसरीतील या विषयावरील स्फुट वाचून सर्व मंडळीना खूप करमणूक झाली. टिळक हे कोणत्या 'ब्रॉडस्टेअर्स' गावी मेंदूच्या विकाराने.