पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ आहेत असे समजते. तसे झाल्यास डेप्युटेशनच्या मंडळीस इंडिया पत्र आपल्या हाती घेऊन चालवावे लागेल व त्यास आम्ही एका पायावर तयार आहो. काँग्रे- सच्या सत्तेचे येऊन जाऊन एक वर्तमानपत्र. ते कोणत्याहि कारणाने हाती न राहिल्यास आम्हास तात्पुरते स्वतंत्र वर्तमानपत्र काढावे लागणार ! पण बहुधा हा प्रसंग 'इंडिया' च्या डायरेक्टर मंडळीच्या समजूतदारपणाने दळावा असे वाटते. पोलाकसाहेबानी सहा आठवडे तरी गोता देऊन घेतला. पुढे काय होते पहावे. (१०२) माधवराव बोडस यांचे टिळकाना पल मुंबई १९ जुलै १९१९ तुमच्या ६४ व्या वाढदिवसाबद्दल तुमचे अभिनंदन करतो. या व पुढच्या मेलबोटीने बहुधा तुमचेकडे खंडोगणती अभिनंदनाची पत्रे येथील. येथे तुमच्या अनुयायीगणानी तुमच्या नावाने भिक्षांदेही करण्याचा सपाटा चालविला आहे. यवतमाळच्या बाबा परांजप्यानी कसले तरी तुमचे एक भिकारडे चित्र छापून ते एक रुपयास विकण्याची क्लसि काढली आहे. पैसे उकळण्याकरिता तुमच्या अनुयायानी जी देशभर धामधूम चालविली आहे त्याबद्दल इकडे लोक काय काय टीका करितात हे ऐकण्यास तुम्ही येथे नाही हे एका परीने बरे आहे. रामाने माकडांच्या सहाय्याने लंका जिंकण्याचा पराक्रम केला त्याप्रमाणे तुम्हाला वाटले असेल की या महामूर्ख व गाढव अनुयायाना हाताशी धरून आपण स्वराज्य हस्तगत करू. स्वराज्य तर दूरच आहे म्हणा. पण राष्ट्रीय पक्षाची अब्रू व कीर्ति या अनुयायानी धुळीस मिळविण्याचा तूर्त उद्योग चालविला आहे इतके मात्र खरे. गेल्या पाच वर्षात मिसेस बेशंट गांधी व टिळक हे पुढारी उदयास आले. पण आता लोक म्हणतात त्यांच्यात काही जीव नाही. कारण बिझांट देशद्रोही ठरली. गांधींच्यात धैर्य नाही. आणि मुलाना काही तरी इष्टेट उरावी म्हणून तुम्ही हा दारोदार भीक मागण्याचा उद्योग आरंभला ! असे लोक बोलतात. यात तुमच्या आजपर्यंतच्या स्वार्थत्यागाची असेल नसेल ती कीर्ति मातीला मिळ: णारसे वाटते. लंका विजयानंतर वानरसैन्याचे जू जसे रामचंद्राला झुगारून देता आले नाही तशीच स्थिति इकडे आल्यावर तुमचीहि होणार ! विलायतेत सर्व पक्षांची एकी होण्याचा योग नाही हे वाचून खेद वाटला. सकृद्दर्शनी असे दिसते की तिकडे परक्यांच्या समोर देखील येथील घरची पक्ष- भेदाची भांडणे तुम्ही विसरण्यास तयार नाही. नेमस्ताना काय हवे ते करू द्या. तुम्ही आपला स्वतंत्र कार्यक्रम का आखीत नाही ! ( १०३ ) टिळकांचे धोंडोपंतास पल लंडन २४ जुलै १९१९ माझ्या प्रकृतिसंबंधी खोट्यानाट्या बातम्या उठल्या आहेत त्यावर मुळीच विश्वास ठेऊ नका. कोणी काय हेतूने या उठवल्या असतील कोणास ठाऊक ?