पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ 33 निवडक कागदपत्र ५१ ही कोणती ? या प्रश्नास बाईनी उत्तर दिले ते असे -" टिळकांचा स्वराज्य- संघ व माझा संघ मूळपासूनच वेगवेगळे होते. कारण आम्हा उभतांचा व्यक्तिशः द्वेष करणारांचा निरनिराळ्या संघात समावेश करिता यावा. मी हिंदी लोकांची स्थिति सुधारण्याची खटपट अनेक बाजूनी करिते. इतर लोक ही गोष्ट माझ्याइतकी करीत नाहीत. म्हणून व्यक्तिश: मला अनुसरणारे फार व म्हणून माझ्या चळ- वळीत माझे व्यक्तित्व दिसून येते. मद्रास-संघाची मी संस्थापक. पण गांधींच्या चळवळीमुळे मी अप्रिय झाले. मुंबईच्या रंगेल संघवाल्यानी मला शिष्टमंडळात न धाडण्याचे ठरविले व मला तर यावयाचे होते. म्हणून त्याकरिता मी माझा नवा संघ निर्माण केला. ( १०१ ) बातमीपत्र लंडन १० जुलै १९१९ राष्ट्रीय सभेचे खास शिष्टमंडळ येथे येऊन तिच्या ठरावानुसार चळवळ करीत असता, तिच्या पैशाने चालविलेल्या 'इंडिया' वर्तमानपत्राने तिच्या ठरावा- विरुद्ध व धोरणाविरुद्ध लिहीत असावे एवढेच नव्हे तर तिच्याविरुद्ध उठलेल्या नेमस्त शिष्टमंडळाचा उघड किंवा प्रच्छन्नपणाने पाठपुरावा करीत रहावे हा अप्र- योजकपणाचा कळस होय. किंबहुना इंडिया पत्राचे हे वर्तन पाहून 'मदीयेन भक्त- परिव्ययेन पारलौकिको भर्ता अन्विष्यते !' या मृच्छकटिकातील वाक्याचे स्मरण होते. असो. ब्रिटिश काँग्रेस कमिटीचे आम्हाशी वागण्याचे धोरण सामोपचाराचे आहे हे मी मागे लिहिलेच होते. व कमिटीच्या ऑफिसची जागाहि तिने आमच्या ऑफिसकरिता वापरण्यास दिली. यामुळे 'इंडिया'चे संपादक मि. पोलक यानी आम्हास असे कळविले की तुमच्यापैकी सहीनिशी कोणी लेख वेळेवर दिल्यास तो आपण 'इंडिया'त घालू. पण आपल्याच वर्तमानपत्रात आपण परक्याप्रमाणे लेख सहीवर द्यावा आणि संपादकानी त्यावर मालकीहक्काने टीका करावी ही गोष्ट हास्यास्पद वाटून आम्ही मि. पोलक यानी दिलेल्या सवलतीचा फारसा उप- योग केला नाही. शेवटी थोडे दिवस वाट पाहून आम्ही 'इंडिया' पत्राच्या स्थानिक चालक ( डायरेक्टर) मंडळास पत्र लिहिले. तेव्हा त्यानी असा ठराव केला की 'इंडिया पत्राने दिल्ली येथील राष्ट्रीय सभेच्या ठरावानुसारच लिहिले पाहिजे. ' हा ठराव हाती येताच संपादकांच्या तब्येतीची चाचणी पहाण्याकरिता आम्ही काही मजकूर ताबडतोब मि. पोलक यांच्याकडे पाठविला पण त्याना तो पसंत पडला नाही. पण पोलाकसाहेब हे काही 'इंडिया' पत्राचे मालक नव्हते. त्याना डायरेक्टरांचा हुकूम अमान्य करण्याचा काय अधिकार ? अर्थात् त्याना केवळ आपलेच धोरण चालवावयाचे तर संपादकाच्या जागेचा राजीनामा देण्याखेरीज गत्यंतर नाही. व त्याप्रमाणे ते आपला राजीनामा डॉ. क्लार्क यांच्याकडे धाडणार टि० उ... २८