पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र ( ९८ ) अहवाल भाग ५ लंडन १५ जुलै १९१९ कमिटीपुढे मांडण्याच्या कैफियती तयार झाल्या. या आठवड्यातील सगळी चळवळ घरबैठीच झाली. कॉंग्रेस कैफियत विस्तृत आहे. परिशिष्टात दिल्ली कॉंग्रेसचे ठराव दिले आहेत. वेझन्टवाईंच्या कैफियतीत बिल कलमवार घेऊन काँग्रेस नेमस्त होमरूललीग वगैरेंचे त्यावरील म्हणणे तुलना पद्धतीने दिले आहे. आमच्या लीगच्या कैफियतीत काँग्रेसच्या योजनेला धरूनच पण एक वेगळी योजना दिली आहे. काल कमिटीचे काम सुरू झाले. सर जेम्स मेस्टन यांची साक्ष प्रथम झाली. आम्ही लघुलेखक नेमणार होतो पण सरकारी लघुलेखकानी घेतलेल्या रिपोर्टीची एक एक छापील प्रत दर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येक शिष्टमंडळाला देण्याचे सरकारने कबूल केले आहे. तेव्हा आमचे आयतेच काम झाले. तथापि पटेल व केळकर हे रोज कमिटीला हजर राहून टिपणे घेतील व केळकर त्यांचा सारांश इंडिया पत्राच्या अंकात देत जातील. प्रत्येक होमरूल लीगने एक साक्षीदार पाठ- वावा असे ठरले आहे. त्रि. काँ. कमिटीशी वाटाघाट केली तिला फळ आले. मि. पोलाक 'इंडिया' पत्राच्या संपादकाचा राजीनामा देणार व त्यांचे जागी केळ- कराना नेमणार. नेमस्त लोक स्वतःचे एक पत्र येथे काढावे म्हणतात. त्या कामाला पोलॉक आता रिकामेच आहेत ! ता. १३ रोजी बेझन्टबाईनी लँगहॅम हॉटेलमध्ये एक भाषण केले. सामोपचाराचेच होते पण हिंदुस्थानात विरोध झाला याची त्याना आठवण आहे. म्हणून पंजाब प्रकरणात डेप्युटेशन पाठवू त्यात त्या आमच्या बरोबर जाण्यास तयार नाहीत. आपल्या हद्दपारीविरुद्ध प्रीव्हि कौंसिलकडे अपील करण्याचा हॉर्निमन यांचा विचार आहे. खापर्डे व दिवाण- साहेब निवडक लोकांच्या गाठी घेत असतात. (१९) अहवाल लंडन २४ जुलै १९१९ इंडिया पत्र आपल्या हाती आले. ब्रिटिश कमिटीच्या घटनेचा विचार सुरू आहे. कमिटीची तडफ जिरली. सिलेक्ट कमिटीची 'हकीकत' इंडिया पत्रात आढळेल. पंजाब प्रकरणात नेमस्तहि आम्हावरोबर जाऊ इच्छित नाहीत असे आता समजते. प्रधानमंडळात खळबळ आहे. आयर्लंड व कोळशाच्या खाणी हे प्रश्न जोरावले आहेत. सिलेक्ट कमिटीने आपली प्रश्नावली तयार केली आहे. तिची उत्तरे भरून पाठवीत आहो. (१००) बातमीपत्र लंडन ३० जुलै १९१९. कॅप्टन ऑर्मसबी गोर यानी बेझंटबाईना शेवटी एक प्रश्न सहज म्हणून टाकला. ते म्हणाले “ तुमच्या मागे कितीसे लोक आहेत १ तुमची होमरूल लीग