पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ निवडक कागदपत्र ४९ दोन हजार पौंड पाठवावे. हुंडणावळीचा फायदा होईल व रकमेचीहि जरूर पडणार आहे. विशेषतः चिरोलच्या खर्चाकरिता रक्कम भरावी लागेल. रक्कम केळकर यांचे नावे नॅशनल बँकेकडे पाठवावी. माझे नावे पाठवू नये. किंवा दुसऱ्या बँकेकडेहि पाठवू नये. सोबत एक कान्फिडेन्शल सर्क्युलर पाठविले आहे ते खाडिलकर भट गोखले करंदीकर यास वाचण्यास द्यावे. ते दुसन्या कोणास दाखवू नये. फक्त वाचण्यास सांगावे व वाचून झाल्यावर आपले पाशी ठेवावे. नक्कल बाहेर जाऊ देऊ नये. तात्या केळकर यास ते येथे दाखविले आहे. व त्यांचेबरोबर वाटाघाटहि केली आहे. केसरी मराठ्याकरिता नवीन मशीन घेण्याचा उद्योग सुरू आहे. चौकशी करीत आहे. (९६) एलिझाबेथ आर्नोल्ड यांचे टिळकाना पत्र लंडन १० जुलै १९१९ या आठवड्यात मला नवीन पाठ देण्याचा दिवस कोणता हे आपण कळविले नाही. मला सवड आहे. तरी कळवावे. मी महात्माजीकरिता प्रत तयार करीत असता माझ्या हातून काही हस्तदोष घडले त्याबद्दल मला फार वाईट वाटते. ' इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता:' ही ओळ मी लिहीत आहे व लिहून आणून दाखवीन. महात्माजी इकडून गेल्यावर मला पाठ कोण देणार ही कल्पना मनात येऊन फार खेद वाटतो. (९७) अहवाल लंडन १० जुलै १९१९ या आठवड्यात नॅशनल इं. असोसिएशनची चहापार्टी झाली. प्रसंग खाजगी स्वरूपाचा होता. पूर्वीच्या आठवड्यात बेझन्टबाई एडिंबरो व ग्लासगो येथे व्याख्याने देण्यास गेल्या होत्या त्या परत आल्या. आता तूर्त बाहेरगावी जाऊन व्याख्याने देण्याचे होत नाही. सिलेक्ट कमिटीला सुरवात लवकरच होईल. त्या करिता आम्ही सर्वजण कैफियतीची टांचणे तयार करीत आहोत. दिल्ली कॉंग्रेसच्या ठरावाप्रमाणे बादशहाना शिष्टमंडळाने येथे मानपत्र द्यावे असा विचार चालू आहे. पण परवानगीची नड बहुधा येईल. ता. २०-२२ रोजी तहाच्या नावाने मोठा उत्सव समारंभ होणार आहे. पार्लमेंटमध्ये अंतस्थ गडबडी सुरू आहेत. आणि नव्या निवडणुकी होण्याचे ठरले तर बिल पुढच्या वर्षावर जाईल म्हणून कमिटीचे काम ऑगष्टातच उरकून घेणार म्हणतात. लजपतराय यांचे अमेरिकेहून पत्र आले. त्यांचे काम बरे चालले आहे.