पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ या विजयाने इंग्रजाना मार्ग मोकळा झाला. हिंदुस्थानच्या वतीने बिकानेरच्या महाराजानी तहावर सही करून या बोडणात हात ओला करून घेतला. पण हिंद- देवीच्या कपाळावर स्वराज्याचा टिळा मात्र आताच लागण्याचे चिन्ह दिसत नाही ! वारशाच्या समारंभात वांझोटीकडे पाळण्याला चार झोके देण्याचे काम येणे यात फारसे औचित्य नाही; पण श्रीमंताच्या घरचे सोन्याचे जड पाळणे हाल- वायाला गरीब शेजारणीहि उपयोगी पडतात ! त्याना चोळीचा एक खण दिला म्हणजे पुरतो ! ( ९४ ) निरंजन पाल यांचे टिळकाना पत्र लंडन ४ जुलै १९१९ मी इतके दिवस तुम्हाला येऊन का भेटलो नाही याची अनेक कारणे आहेत. पण ती सांगत बसत नाही. आपण माझ्या वडिलांचे स्नेही म्हणून मला आश्रय देतच आहा. परंतु स्वावलंबन मला अधिक आवडते म्हणून मी त्या उद्योगात अधिक असतो. मला इंग्लंडच्या बाहेर जावयाचे होते पण पासपोर्ट मिळाला नाही. तरीहि मी अधिकाऱ्यांची नजर चुकवून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होतो. पण ती गोष्ट उघडकीला आली व मला प्लीमथ येथे तीन महिने अटकेत रहावे लागले. मी सिनेमा कंपनी संबंधाची एक योजना केली आहे. त्याचे भांड वल मला हिंदुस्थानातून मिळेल तर हवे आहे. भरतभूमि पूर्वी कशी होती याची कल्पना इकडील लोकाना आणून देणे फार सोईचे व उचित आहे. बुद्ध चरित्र सिनेमाच्या द्वारे दाखविले तर ते फार लोकप्रिय होईल असे लोक सांगतात. असा एखादा चित्रपट तयार करण्याला प्रथम खर्च ३०,००० पौंड येईल पण नफा एक लक्ष पौंड होईल असे म्हणतात. म्हणून अशा कामी परकी भांडवल- वाल्यांची मदत घेणे प्राप्त झाले तर सहजच वाईट वाटणार. अमेरिकन फिल्म- वाला थॉर्नटन हिंदुस्थानात जात आहे त्याचेबरोबर बुद्धचरित्र व रामायण यांचे संबंधाने काही चित्रपट तयार करावा म्हणून मीहि जाणार आहे. आपणाला ही सर्व हकीकत कळविणे हे माझे कर्तव्य समजून कळविली आहे आणि लवकरच समक्ष येऊन भेटतो. (१५) टिळकांचे धोंडोपंतास पत्र लंडन ९ जुलै १९१९ नेने याजकडे प्रॉमिसरी नोटा होमरूललीगतर्फे ठेवण्यास द्याव्या. त्या आमच्या खाजगी नव्हत. मग कोणी ठेवल्या तरी चालतील. भावे यांचे सर्व पैसे द्यावे. प्रॉ. नोटी विकणे त्या पुढे भाव आल्यावर विकू. आताच विकण्याची जरूरी नाही. मला पूर्वी पाठवलेले दोन हजार पौंड मी होमरूलचे कामी खर्च करणार आहे. व काही रक्कम खर्च केलीहि आहे. कारिता आता पुन्हा पर्स फंडापैकी